मोहरी शाळेतील मतिमंद मुलांना स्नेहभजनाचे आयोजन-डॉक्टर विठ्ठल गायकवाड 'पित्याच्या स्मृती प्रित्यर्थ आठवणींना उजाळा देणारा विठ्ठल गायकवाड...
मोहरी शाळेतील मतिमंद मुलांना स्नेहभजनाचे आयोजन-डॉक्टर विठ्ठल गायकवाड
'पित्याच्या स्मृती प्रित्यर्थ आठवणींना उजाळा देणारा विठ्ठल गायकवाड हा एक "अवलिया पुत्र"
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील श्री. क्षेत्र हनुमान टाकळी येथील कै. आसाराम गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ मातोश्री लॅबचे संचालक व आदिनाथ नागरी पतसंस्थेचे मॅनेजर मुकुंद गायकवाड या कलियुगातील राम-लक्ष्मण बंधूंनी वडिलांच्या पंधराव्या पुण्यस्मरणानिमित्त समाजातील अनाथ व दुर्बल घटकातील मतिमंद मुलांना स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. वडिलांच्या आठवणींना उजाळा देत एक दिवस या मुलांना खर्च करून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणे हीच खरी वडिलांना श्रद्धांजली ठरेल या भावनेने दरवर्षी ते असे सामाजिक उपक्रम घेत असतात.
या कार्यक्रमासाठी हनुमानटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते बंडू बर्डे हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. तर यावेळी विचार मंचावर शुभम बर्डे, झावरे सर, खताळ सर, अनिल गवते, अमोल साळवे, डॉक्टर विठ्ठल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड, व मुकुंद गायकवाड हे उपस्थित होते.
काय जादू झाली
ही अक्षरांना वाचल्यावर,
फाटक्या या जिंदगीचे
रेशमी जरतार झाले.
या गुलाब मेश्राम यांच्या गझलेच्या तुकड्यासारखे आमचे आयुष्य होते. वडील कै. आसाराम गायकवाड यांनी आम्हाला शिक्षण दिले आणि मी आणि माझा भाऊ मुकुंद आमचे दोघांचे आयुष्य बदलून गेले, गरिबीशी संघर्ष करत उद्योग व नोकरीनिमित्त आम्ही बाहेर पडलो व जीवनात आर्थिक व सामाजिक आमुलाग्र बदल घडून गेले. समाजातील वंचित घटकासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने गेली पंधरा वर्षे आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवत गेलो. वडिलांच्या संस्काराचा ठसा आमच्या काळजावरती लहानपणीच कोरला गेला व आमच्या मातोश्रीने आम्हाला जे संस्काराचे धडे दिले त्यामुळेच आमचे हातून सामाजिक कार्य घडत आहे असे विचार दिव्यांग संघटनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर विठ्ठल गायकवाड यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते विष्णू गायकवाड यांनी अंधश्रद्धेमुळे माणूस कसा भरकटला जातो व बुवाबाजी करणारे समाजातील भोळ्या भाबड्या नागरिकांना कसे फसवतात याचे प्रात्यक्षिक मुलांना करून दाखवत सामाजिक समतेचा संदेश नेहमीच आपल्या कार्यक्रमातून देणारे विष्णू गायकवाड यांनी यावेळी मुलांच्या भावना ओळखून त्यांचे मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मेघनर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन करताना मुकुंद गायकवाड यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानणारी माणसेच खरी समाजातील आनंद दूत असतात व मानव सेवा हाच आपल्या जीवनाचा स्थायीभाव आहे असे गौरव उद्गागार यावेळी काढले. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थितांचे मनापासून त्यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवनाथ व प्रणव गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments