Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

महेश राख खून प्रकरणातील संशयित आरोपींना गंगाई लाॅन व फुलेवाडी रिंग रोड परिसरात घटनास्थळी फिरवले .

 महेश राख खून प्रकरणातील संशयित आरोपींना गंगाई लाॅन व फुलेवाडी रिंग रोड परिसरात घटनास्थळी फिरवले . आरोपींना पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्...

 महेश राख खून प्रकरणातील संशयित आरोपींना गंगाई लाॅन व फुलेवाडी रिंग रोड परिसरात घटनास्थळी फिरवले .

आरोपींना पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी 


फुलेवाडी वार्ताहर -नारायण लोहार 


महेश राग याचा मित्र ओंकार शिंदे याच्या घरासमोरील दृश्य


फुलेवाडी रिंग रोड परिसरात आठवड्यापूर्वी वर्चस्व वादातून सराईत गुन्हेगार महेश राख याचाआदित्य गवळी टोळीच्या जवळपास बारा ते पंधरा गुंडांच्या सहाय्याने खून करण्यात आल्याचा संशय आहे. या गुन्ह्यातील तपास करण्यासाठी संशयित आठ आरोपींना सोमवारी सायंकाळी सात वाजता घटनास्थळी तसेच फुलेवाडी रिंग रोड वरून आदित्य गवळी यांच्या दत्त कॉलनी परिसरात फिरवण्यात आले. यावेळी आरोपींना पाहण्यासाठी फुलेवाडी रिंग रोड  व गंगाई लाॅन परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

  आठ दिवसापूर्वी गंगाई लॉन च्या मागील बाजूस तडीपार गुंड महेश राख याचा एडका, तलवार, सत्तुर अशा धारदार शस्त्राने सपासप वार करून गवळी टोळीने रात्री एक वाजण्च्या दरम्यान हल्ला केला होता. महेश राख याचा मित्र ओंकार शिंदे यांच्या घरावर हल्ला करून बाटल्या फोडून गाड्यांची गवळी टोळीने तोडफोड केली होती. दरम्यान खूनाच्या गुन्ह्यात वापरलेली हत्यारे संशयितनी विविध ठिकाणी टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्या शस्त्रांचा शोध घेण्याचे  काम करवीर पोलीस  स्टेशनचे पोलीस करत आहेत. या गुन्ह्यातील संशयितना तपासासाठी सोमवारी सायंकाळी सात वाजता घटनास्थळी तसेच फुलेवाडी रिंग रोड, गंगाई लाॅन आणि दत्त कॉलनी परिसरात फिरविण्यात आले.  संशयित आरोपींना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे तपास अधिकारी बाबासाहेब सरवदे यांच्यासह पोलीस फौज फाटा, होमगार्ड घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आरोपीना बाटल्या कुठे फोडल्या असे विचारले असता त्यावेळी आरोपींनी महेश राख याचा मित्र ओंकार शिंदे च्या घरासमोरील जागा दाखवली.

No comments