Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

चर्मकार विकास संघाच्या गुणगौरव सोहळ्यातून अधिक चांगले काम करण्याची मिळते प्रेरणा - खासदार भाऊसाहेब वाकचौरे

 चर्मकार विकास संघाच्या गुणगौरव सोहळ्यातून अधिक चांगले काम करण्याची मिळते प्रेरणा - खासदार भाऊसाहेब वाकचौरे  अहिल्यानगर प्रतिनिधी : बाळासाहे...

 चर्मकार विकास संघाच्या गुणगौरव सोहळ्यातून अधिक चांगले काम करण्याची मिळते प्रेरणा - खासदार भाऊसाहेब वाकचौरे 



अहिल्यानगर प्रतिनिधी : बाळासाहेब कोठुळे-  समाजातील गुणी विद्यार्थी ,कर्तुत्ववान व्यक्ती, आदर्श शिक्षक तसेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याचा गुणगौरव केल्यामुळे त्या व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप पडते आणि त्याला पुढील काळात अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष संजय खामकर यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काढले.

एकच ध्यास विकास, न्याय हक्क आणि सन्मान या ध्येयाने प्रेरित होऊन, चर्मकार विकास संघ आणि लोकनेते आमदार सीतारामजी घनदाट मामा सामाजिक प्रतिष्ठान अहिल्यानगर च्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व समाज बांधवांचा गुणगौरव सोहळा, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.  अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार वाकचौरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चर्मकार ऐक्य संघाचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे होते. कार्यक्रमासाठी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, पारनेर नगर विधानसभेचे आमदार काशिनाथ दाते, चर्मकार विकास संघाचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जेष्ठ विनोदी कथा कथनकार संजय कळमकर, चर्मकार ऐक्यचे कार्याध्यक्ष डॉ.वसंतराव धाडवे, चर्मकार विकास संघ साहित्यिक विभागाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, नगरसेवक सुनील त्रिंबके, चर्मकार विकास संघ जिल्हाध्यक्ष संतोष कानडे वाल्मीक साबळे,लोकनेते सितारामजी घनदाट मामा सामाजिक प्रतिष्ठनचे सर्जेराव गायकवाड , रामराव ज्योतिक, मच्छिंद्र दळवी,राजेंद्र धस, अण्णासाहेब खैरे, सौ.प्रतिभा संजय खामकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज  यांना अभिवादन व दीप प्रज्वलन करून महाआरती झाली.

 ५१ हजाराची ३ फूटी संत रविदास महाराज यांची मूर्ती मच्छिद्र दळवी सर यांनी संत रविदास विकास केंद्र अहिल्यानगर करीता भेट दिली त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

 केंद्र आणि राज्य शासनाने जी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती  प्रक्रिया सुरु केली आहे. त्याला काहीच अर्थ नाही. या नोकरीत सेवकाला कोणतीच अशी शाश्वती नाही. त्यामुळे नोकरीच्या भानगडीत न पडता व्यवसाय करा. चर्मकारांसाठी समाज कल्याण खात्याच्या योजनांमध्ये काही अर्थ नाही त्या कधीच हद्दपार झालेल्या आहेत.  सरकारच्या कृषी, दुग्ध , वाणिज्य औद्योगिक विभागाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत त्याचा लाभ घ्या आणि स्वतःच्या पायावर उभे रहा असे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले.

पारनेर नगर विधानसभेचे आमदार काशिनाथ दाते यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी त्यांचा सन्मान करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना पुरस्काराचे प्राप्त आदर्श शिक्षक यांची जबाबदारी वाढली असून सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आव्हान केले.

या वेळी विधानसभा आमदार काशिनाथ दाते, व्याख्याते संजय कळमकर, डॉ. वसंतराव दांडगे,नगर सेवक सुनील त्रिंबके, चर्मकार विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष संजयजी खामकर अदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी एकनाथ कानडे व देवराव तांबे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करुन समाजातील ५१ शिक्षक व शिक्षिकांना आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ प्रदान त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. तसेच येरवडा कारागृहाचे जेलर रेवणनाथ कानडे यांचा पदोन्नती बाबद, प्रांजली आंबेडकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल, तर बारामती इथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल अनिल शेलार यांचा सन्मान करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त अशोक कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तवीक भाषण साहित्यिक सुभाष सोनवणे यांनी केले. तर सुत्रसंचलन व स्वागत संतोष कानडे यांनी केले.

 यावेळी  रामदास सोनवणे, अरुण गाडेकर, कारभारी देव्हारे सर,  रुक्मिणी नन्नवरे, संगीता वाकचौरे, रामदास सातपूर,  अरविंद कांबळे, सुरेश शेवाळे, अर्जुन वाघ, संजय गुजर, संतोष कंगणकर,विनोद कांबळे, रुपेश लोखंडे, मनीष कांबळे, संतोष कांबळे, दिलीप कांबळे,दिनेश देवरे,गणेश हनवते,राजाराम केदार,भाऊसाहेब आंबेडकर, हेमलता कांबळे,आकाश गायकवाड, संतोष खैरे,मनोज गवांदे, अशोक खैरे देविदास साळुंके विनोद खैरे . किरण घनदाट कैलास वाघमारे . संदीप डोळस .अकाश गायकवाड,बाळासाहेब कदम उपस्थित होते.

गुणगौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

No comments