Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

श्रीमती विना मेश्राम आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित .

 श्रीमती विना  मेश्राम  आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित .  अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण वि...

 श्रीमती विना  मेश्राम  आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित . 



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या या वर्षाच्या म्हणजेच 2024 - 2025 आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी श्रीमती विना युवानंद मेश्राम यांची निवड झाली असून त्यांना नुकत्याच 17.09.2025 रोजी झालेल्या शानदार सोहळ्यात डॉक्टर अमित सैनी माननीय अतिरिक्त आयुक्त( पूर्व उपनगरे )तसेच डॉक्टर प्राची जांभेकर (माननीय उपायुक्त शिक्षण विभाग )यांच्या हस्ते आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देऊन श्रीमती विना युवानंद मेश्राम यांना गौरविण्यात आले. विना युवानंद मेश्राम या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातील बाजार वॉर्ड उ.प्रा.मनपा हिंदी शाळा कुर्ला येथे प्रशिक्षित शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. 11,000 रुपये रोख सुवर्णपदक, सन्मानचिन्ह ,व सन्मानपत्र , शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे . या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती सुजाता खरे (शिक्षण अधिकारी) डॉक्टर संजय कुमार त्रिपाठी (संचालक वीर माता जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय व वनस्पती उद्यान )कीर्तीवर्धन किरत कुडवे (उपशिक्षणाधिकारी )मध्यवर्ती श्रीमती ममता राव (उपशिक्षणाधिकारी )एस आर एस सी मुख्तार शाह ( उपशिक्षणाधिकारी ) (लोकसहभाग कक्ष )दिनकर पवार प्राचार्य कला विभाग अधीक्षक प्रशासकीय अधिकारी विभाग निरीक्षक कला निदेशक मुख्याध्यापक यांच्या उपस्थित पेग्विन हॉल वीरमाता जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय व वनस्पती उद्यान भायखडा येथे संपन्न झाला शिक्षण प्रवाहामध्ये प्राथमिक स्तरातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचे व नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे धडपड तसेच शाळेत होणाऱ्या बालकोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभाग घेऊन त्यांना बक्षीस मिळवून दिली आहेत शालेय स्तरावर घेण्यात येणाऱ्या विभागीय वकृत्व स्पर्धेत त्यांची विद्यार्थिनी 

(इयत्ता तिसरी )आकांक्षा प्रदीप कुमार गौतम हिने त्यांच्या मार्गदर्शनामुळे दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे . त्यांचा सामाजिक कार्यातही खूप मोलाचा वाटा आहे. त्या त दर रविवारी मस्कर गावामध्ये असलेले घोडा खडकवाडी ( टिटवाळा) या आदिवासी पाड्यात जाऊन ज्ञानदानाचे कार्य करतात.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यशील असणाऱ्या श्रीमती विना युवानंद मेश्राम यांनी अनेक संस्थेकडून बक्षीसे मिळाली आहेत .तसेच बालभारती व राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा आयोजित पीए एम  श्री योजनेअंतर्गत महाराष्ट्र पातळीवर "त्योहारों का मेला " ही पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या या कार्याची दखल घेत आतापर्यंत विविध संस्था आणि संघटनांनी विविध पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.

No comments