कोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न. कर्जमुक्ती योजना, १० लि. सूर्यफूल तेल भेट, नवीन दोन शाखा उ...
कोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.
कर्जमुक्ती योजना, १० लि. सूर्यफूल तेल भेट, नवीन दोन शाखा उघडणार.
फुलेवाडी वार्ताहर
(दि. २१/०६/२०२५) कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक व सेवक सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ताराबाई पार्क कोल्हापूर येथील मांगल्य मल्टीपर्पज हॉल येथे उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी मयत सभासद १०० % कर्जमुक्ती योजना, सभासदांना दीपावली भेट १० लिटर सूर्यफुल तेल देणे, संस्थेच्या नवीन दोन शाखा पन्हाळा व इचलकरंजी येथे सुरु करणे आदी महत्वाच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष विकास कांबळे यांनी केले. सभा वृतांत वाचन व्यवस्थापक बाबुराव साळोखे यांनी केले. आभार उपाध्यक्षा सुजाता देसाई यांनी मानले. यावेळी संचालक आयु. सुजाता भास्कर, दिलीप वायदंडे, विलास दुर्गाडे, नंदकुमार कांबळे, रघुनाथ मांडरे, राहुल माणगावकर, प्रकाश पोवार, रवींद्र मोरे, रघुनाथ कांबळे, संजय कांबळे, योगेश वराळे, बापू कांबळे, दत्तात्रय टिपुगडे, अण्णा पाटील संचालक मंडळ व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी, कोजिमाशि संचालक अनिल चव्हाण, मदन निकम आदींनी संचालक मंडळास शुभेच्छा दिल्या.
No comments