Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे रुग्णांची उत्तम सोय

  क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे रुग्णांची उत्तम सोय  फुलेवाडी वार्ताहर  क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथी...

 क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे रुग्णांची उत्तम सोय 

फुलेवाडी वार्ताहर 

क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे रुग्णांची उत्तम सोय 

कोल्हापूर वार्ताहर -नारायण लोहार 

क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याची सुरुवात 19-09-2024 रोजी झाली. हा दवाखाना सीपीआर अंतर्गत चालवला जातो. सीपीआर  दवाखान्यातील गर्दी कमी व्हावी या उद्देशाने हा दवाखाना सुरू करण्यात आला. या दवाखान्यात आता सरासरी दररोज 50 ते 60 रुग्ण तपासले जातात. येथे सर्व आरोग्यविषयक उपचार व सल्ला दिला जातो. यामध्ये बीपी, शुगर तपासणी, रक्त लघवी चाचणी, लिव्हर फंक्शन, ताप सर्दी खोकला इत्यादीवर उपचार केले जातात. या दवाखान्याची वेळ दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत अशी आहे. दवाखान्याच्या वेळेसंबंधी डॉ. निशिगंधा जाधव यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, सकाळी सीपीआर मध्ये 9ते 1 वाजेपर्यंत रुग्ण तपासले जातात. दुपारपासून रात्रीपर्यंत नाना पाटील नगर, नरसिंह कॉलनी, गंगाई लाॅन, भोगम पार्क, बोंद्रे नगर या परिसरातील रुग्णांची सोय व्हावी म्हणून हा आपला दवाखाना सुरू करण्यात आला. या परिसरातील नागरीक सकाळपासून शहरात कामाला जातात. ते सायंकाळी घरी आल्यानंतर आपल्या घरातील रुग्णांना या दवाखान्यात उपचारासाठी घेऊन येतात. या रुग्णांपैकी गीता विजय कोगनोळीकर यांना या दवाखान्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की ,रात्री दहापर्यंत हा दवाखाना सुरू असल्याने आम्हाला येथे उपचारासाठी येणे शक्य होते. सीपीआर सारखी गर्दी या दवाखान्यात नसते. येथील डॉ. निशिगंधा जाधव ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने रुग्णांची तपासणी व योग्य सल्ला देतात. विशेष म्हणजे येथे केस पेपरलाही व औषधालाही पैसे द्यावे लागत नाहीत. पूर्णपणे मोफत औषधोपचार केला जातो. त्यामुळे आमच्यासारख्या गरीब रुग्णांना हा दवाखाना देवदूता सारखा वाटतो.

या दवाखान्यात एकूण चार कर्मचारी आहे. त्यापैकी डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक व रक्त लघवी तपासणीस असा स्टाफ आहे. हे चारही कर्मचारी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देतात असे गीता विजय कोगनोळीकर यांनी सांगितले. या डॉक्टर व इतर स्टाफच्या कार्यपद्धतीमुळे रुग्णांची संख्या दिवसे दिवस वाढत चाललीआहे. या दवाखान्यात येणारा प्रत्येक रुग्ण दवाखान्याच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केल्याचे दिसून आले. रुग्णांची गर्दी वाढल्यास डॉक्टर निशिगंधा जाधव व इतर स्टाफ रात्री 10.30 वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करतात. यामुळे रुग्णही डॉक्टरांना मनापासून धन्यवाद देतात.  हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथे सुरू झाल्याने या परिसरातील लोक या दवाखान्याबद्दल चांगले मत व्यक्त करतात. हा सरकारी दवाखाना असल्याने पैसे द्यावे लागत नाहीत. त्यामुळे कष्टकरी व गरीब लोकांचा आधारवड आहे.

No comments