Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

महात्मा फुले विद्यालयाच्या शिक्षिका सौ संध्याराणी देशमुख नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित

 महात्मा फुले विद्यालयाच्या शिक्षिका सौ संध्याराणी देशमुख नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित  रघुनाथ थोरात/उंब्रज टेंभुर्णी,ता.माढा येथील रोटर...

 महात्मा फुले विद्यालयाच्या शिक्षिका सौ संध्याराणी देशमुख नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित 



रघुनाथ थोरात/उंब्रज


टेंभुर्णी,ता.माढा येथील रोटरी क्लब टेंभुर्णीच्या वतीने सन २०२५ मध्ये देण्यात येणाऱ्या  नेशन बिल्डर पुरस्काराने येथील महात्मा फुले विद्यालयाच्या शिक्षिका सौ संध्याराणी देशमुख यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी टेंभुर्णी येथील शासकीय विश्रामग्रहाजवळ असलेल्या रोटरी सांस्कृतिक हॉलमध्ये सायंकाळी ०५.३० वाजता  संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये टेंभुर्णी गावच्या सरपंच सुरजा बोबडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुरक्षा बोबडे होत्या तर अध्यक्षस्थानी डॉ कैलास करांडे हे होते. यावेळी रोटरी क्लब टेंभुर्णीचे अध्यक्ष दिपक व्यवहारे,सचिव संतोष तांबडे, सहाय्यक प्रांतपाल गोमतेश दोशी,सचिव संदीप मोकाशी, महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णीचे मुख्याध्यापक बागवान सर, शिक्षक वृंद तसेच टेंभुर्णीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments