सेवाभाव वृत्तीने काम करणाऱ्या.. (डॉ सौ विदुला विश्वास जोशी) गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ उंब्रज परिसरात सेवाभाव वृत्तीने काम करणाऱ्या, आर...
सेवाभाव वृत्तीने काम करणाऱ्या..
(डॉ सौ विदुला विश्वास जोशी)
गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ उंब्रज परिसरात सेवाभाव वृत्तीने काम करणाऱ्या, आरोग्य सेवेबरोबरच आपुलकी व प्रेमाची वागणूक देणाऱ्या उंब्रज येथील डॉ विदुला विश्वास जोशी यांचा आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे.
त्यानिमित्ताने...
माणसात जसा देव असावा तशा डॉ विदुला जोशी आहेत.त्यांच्याविषयी सांगावे तेवढे थोडेच आहे. वास्तविकपणे सन १९९५ नंतर डॉ विदुला जोशी यांच्याशी माझा संपर्क आला. तत्पूर्वी सन १९८३-८४ मध्ये पुणे येथे वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. डॉ सौ विदुला जोशी या बी ए एम एस डॉक्टर आहेत.सन १९८५ ला विवाहानंतर त्या चाफळ ता.पाटण येथे जनरल प्रॅक्टिस बरोबर स्त्री रोग व आवडीचे क्षेत्र म्हणून अडचणीतील महिलांची प्रसुती करत होत्या. त्यामुळे रात्री अपरात्री महिलांना त्यांचा मोठा दिलासा वाटत असे. सन १९९५ पासून मुलांच्या शिक्षणासाठी त्या उंब्रज येथे स्थायिक झाल्यानंतर काही वर्षांनी माझी त्यांच्याशी ओळख झाली. विविध आजारांवर योग्य मार्गदर्शन व उपचार याशिवाय प्रेम व आपुलकीची वागणूक, जिव्हाळा आपलेपणा त्यांच्याकडून मिळाला. लहान मुलांवरील त्यांनी मायेचा हात फिरवून केलेले उपचार न विसरण्यासारखे आहेत. उंब्रज येथे अनेकांना त्यांनी रुग्ण सेवा देऊन व्याधीमुक्त केले. इन्फर्टिलिटी क्लिनिकच्या माध्यमातून आजही त्या आरोग्य सेवा देत आहेत. अतिशय मायाळू व प्रेमळ डॉक्टर म्हणून त्यांना स्थान आहे. सदैव मदत करण्याची त्यांची वृत्ती भावणारी आहे. माणसात जसा देव असावा तसा त्यांचा स्वभाव आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा...! देव त्यांना उदंड आयुष्य देवो व अशीच त्यांच्या हातून रुग्णांची सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
श्रीमती सुमन जाधव-पाटील
उंब्रज
No comments