भाजप नेते धैर्यशील कदम यांनी घेतले शिवाजीनगरच्या एकवीस दिवसांच्या गणपतीचे दर्शन रघुनाथ थोरात/उंब्रज भाजपचे ज्येष्ठ नेते माननीय श्री धैर्यश...
भाजप नेते धैर्यशील कदम यांनी घेतले शिवाजीनगरच्या एकवीस दिवसांच्या गणपतीचे दर्शन
रघुनाथ थोरात/उंब्रज
भाजपचे ज्येष्ठ नेते माननीय श्री धैर्यशील कदम यांनी कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन शिवाजीनगर(मांगवाडी),ता. कराड येथील एकवीस दिवसांच्या मानाच्या गणपतीला सदिच्छा भेट देत दर्शन घेतले. धैर्यशील कदम हे तळागाळात,ग्राउंड लेव्हलवर काम करणारे,सामान्य कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे एक संवेदनशील नेते म्हणून ओळखले जातात.धैर्यशील कदम यांनी येथील गणपतीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचाही आस्वाद घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दत्ताजीराव पवार,संदीप घाडगे, प्रकाश पवार,राजकुमार सुळे, विकास पवार,अमोल पवार, ज्योतीराम पवार,वसंत पवार, राजू भोंडगे,विक्रम साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार, पोलीस पाटील शंकर घाडगे, आनंदराव सुळे,संजय पवार,दशरथ दवंडे,भास्कर पवार, रामचंद्र पवार,ज्योतीराम माने, प्रसाद पवार,संदीप पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments