Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

दलित पॅंथर चा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

 दलित पॅंथर चा वर्धापन दिन उत्साहात साजरा.  इचलकरंजी तारीख 9/7/2025 रोजी दलित पॅंथरच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी ...

 दलित पॅंथर चा वर्धापन दिन उत्साहात साजरा.



 इचलकरंजी तारीख 9/7/2025 रोजी दलित पॅंथरच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी दलित पॅंथर चे राज्य सरचिटणीस प्रा अशोक कांबळे हे होते. प्रमुख पाहुणे सौ वैशाली अविनाश कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे आशा सुपरवायझर ह्या होत्या. प्रथम पाहुण्यांच्या हस्ते दलित पॅंथरचे संस्थापक कालकथीत नामदेव रसाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

 स्वागत प्रास्ताविक दलित पॅंथरच्या तालुका अध्यक्ष सौ मनीषा कांबळे यांनी केले. याप्रसंगी प्राशू कांबळे यांनी दलित पॅंथर ही आक्रमक संघटना आहे. दलित पॅंथर ची आक्रमकता व्यक्त करताना कार्यकर्त्यांना लोकशाहीची पायमल्ली होता कामा नये असे आव्हान आपल्या भाषणात केले.

 यावेळी सौ प्रियांका कांबळे अब्दुल गफूर शेख, मुबारक शेख सौ अपेक्षा कांबळे अविनाश कांबळे, प्रकाश केसरकर दस्तगीर जमादार, शहनवाज नायकवडे, सुभाष भंडारकवटे, सोमनाथ पांडव नदाफ चाचा, सुभाष कांबळे सचिन कांबळे भीम्माना वडर, अर्जुन आदी मणी, बाळू गोसावी दत्तात्रय गायकवाड, सुधीर कमलाकर, दीपक जाधव इत्यादी प्रमुख उपस्थित होते शेवटी आभार इचलकरंजी शहराध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांनी मानले

No comments