Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

संभाजीराव बडे यांना समाज रत्न पुरस्कार जाहीर.

 संभाजीराव बडे यांना समाज रत्न  पुरस्कार जाहीर. अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे पाथर्डी तालुक्यातील हातराळ सैदापूर येथील सामाजिक कार्य...

 संभाजीराव बडे यांना समाज रत्न  पुरस्कार जाहीर.



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे

पाथर्डी तालुक्यातील हातराळ सैदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वामी विवेकानंद युवा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संभाजीराव बडे यांना राज्यस्तरीय  समाज रत्न पुरस्कार जाहीर झाला असून द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व समाज उपयोगी कार्य केल्याबद्दल त्याना मानाचा व  प्रतिष्ठेचा समाज रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पदक असे आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून लेक वाचवा देश वाचवा, भारतीय तरुणांमधील व्यसनाई कमी करण्यासाठी व्यसनमुक्ती अभियान, प्लॅस्टिक बंदी निर्मूलन, राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा चांगल्या प्रकारच्या चालू राहण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती अभियान, झाडे लावा झाडे जगवा, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी शाळेमध्ये जाऊन राष्ट्रीय एकात्मता अभियान राबविणे. स्त्रीभ्रूणहत्या कमी करण्यासाठी लेक वाचवा लेक शिकवा अभियानाद्वारे मुलींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आला. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना कळविण्यात आले होते की, ज्यांना आपली मुले गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील त्या सर्वांना मिळकतीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात येईल याची दखल घेऊन महाराष्ट्रातील बऱ्याचशा ग्रामपंचायतींनी अंमलबजावणी केली. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील शिंदे या ग्रामपंचायतीने सर्वात प्रथम अंमलबजावणी केली. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात आपल्या कर्तुत्वाचा ठसा त्यांनी उमटविला. तसेच जातीय सलोखा राखण्यासाठी विविध उत्सव यांच्या माध्यमातून सर्व समाजातील व धर्मातील लोकांना एकत्रित गुण्यागोविंदाने नांदता यावे यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव एक गाव एक गणपती या अभियान राबविले. शिवजयंती निमित्ताने विविध संतांचे व्याख्याने विचार तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक जनजागृती केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक पेड मा के नाम अभियान राबविण्यात आले. एक वृक्ष प्रत्येकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ रोपण करावा. आईच्या नावाने एक वृक्ष लावावा या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरण रक्षण होय. झाडे म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले एक अमृत वरदान आहे. विवेकानंद प्रतिष्ठान व शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली की, मी एक झाड लावून त्या झाडाचे संवर्धन करीन या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करून आपला भारत देश सुजलम सुफलम करून जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करावा हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. राज्यस्तरीय भारतीय समाज रत्न हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी संभाजीराव बडे यांचे अभिनंदन करून पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments