*दादा पाटील राजळे महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन* अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- मंगळवार दिनांक 15 जुलै...
*दादा पाटील राजळे महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन*
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-
मंगळवार दिनांक 15 जुलै 2025 रोजी सकाळी दहा वाजता गुणवत्ता सुधार योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि दादा पाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय आदिनाथनगर यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे महिला विषय असणाऱ्या कायद्यांची माहिती देणे त्यांच्यामध्ये आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करणे या हेतूने आदरणीय आमदार मोनिकाताई राजळे यांचे मार्गदर्शनाखाली महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेसाठी मा. मोनालीताई राजळे, आदर्श सरपंच, का. पिंपळगाव, ॲड.अनुराधा येवले सदस्या बालकल्याण समिती अहिल्यानगर, डॉक्टर अंबिका वाघ स्त्रीरोग तज्ञ पाथर्डी आणि प्रियंका आठरे व दिघोळे भरोसा सेल अहिल्या नगर यांचे महिला हक्क संहिता विषयक, नियम, कायदे सुरक्षा, महिलांचे स्वास्थ्य व आरोग्य, महिलांची परिस्थिती जन्य निर्णय क्षमता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी समाजातील कर्तुत्ववान महिलांशी सहसंवाद करता येणार आहे तरी या कार्यशाळेसाठी पाथर्डी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील प्राध्यापिका, विदयार्थीनी तसेच परिसरातील महिलांनी उपस्थित रहावे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, कार्यालयीन अधीक्षक श्री विक्रमराव राजळे, समन्वयक डॉ. साधना म्हस्के आणि डॉ. निर्मला काकडे यांनी केले.
No comments