🌟 बातमी : गुरुपौर्णिमेनिमित्त नरसिंहवाडीत ‘White Army International NGO’ तर्फे आपत्ती व्यवस्थापन मदत कार्य 🌟 नरसिंहवाडी, दि. 10 जुलै 2025...
🌟 बातमी : गुरुपौर्णिमेनिमित्त नरसिंहवाडीत ‘White Army International NGO’ तर्फे आपत्ती व्यवस्थापन मदत कार्य 🌟
नरसिंहवाडी, दि. 10 जुलै 2025 –
White Army International NGO - "Do For Nation, Die For Nation" तसेच जिवन मुक्ती सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त नरसिंहवाडी येथे एक विशेष आपत्ती व्यवस्थापन कॅम्प आयोजित करण्यात आला.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या लाखो भक्तांच्या आगमनामुळे कोणतीही दुर्घटना किंवा अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात तसेच कृष्णा नदी पात्राजवळ स्वयंसेवकांनी सक्रिय मदत कार्य केले. भक्तांना सुरक्षित रांगेतून दर्शन घेता यावे यासाठी संपूर्ण नियोजन व अंमलबजावणी यशस्वीपणे पार पडली.
हा उपक्रम मा. आशोक रोकडे, मा. प्रशांत शेंडे, मा. प्रदीप ऐनापुरे आणि विनायक भट तसेच मातोश्री सुप्रिया गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
उल्लेखनीय म्हणजे White Army International NGO, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अंतर्गत स्वराज्य विद्यार्थी संघटना, कोल्हापूर शहर अध्यक्षा व महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना करवीर तालुका युवती उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या मा. साक्षी रणजीत गोरे यांनी वरिष्ठ कॅडेट म्हणून सक्रिय सहभाग घेतला.
Malhar Charitable Trust, Kolhapur अंतर्गतही त्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेत असून –
लाडकी बहिण योजना
वृक्षारोपण
झोपडपट्टीतील गरीबांना कपडे वाटप
मुक्या जनावरांसाठी चारा वाटप
अशा विविध कार्यांत त्या कार्यरत आहेत.
साक्षी गोरे यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असून, अशा तरुण कार्यकर्त्यांमुळेच समाजात सकारात्मक बदल घडत आहे.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
— प्रतिनिधी
No comments