Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

मुरगुड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

 मुरगुड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश   पाचवीचे 7 आठवीचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक पत्रकार- सुभाष भोसले महाराष्...

 मुरगुड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


 

पाचवीचे 7 आठवीचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

पत्रकार- सुभाष भोसले

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील पाचवीचे 7 तर आठवीचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. पाचवी मधील तब्बल सात विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनल्याने शाळेने कागल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

इयत्ता पाचवी मधील सार्थक खराडे ,कस्तुरी गुरव, श्रीअंश वंडकर, आदित्य जाधव, साईराज बोंडगे ,विराज आमते, मयूर येसादे तर आठवी मधील ज्योतीराज रावण, समृद्धी भोसले यांचा समावेश आहे .

 पाचवी चे 54 विद्यार्थी व आठवीचे 51 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

 या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई ,अध्यक्ष शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत ,चेअरमन  डॉ. मंजिरी मोरे देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर युवा नेते दौलतराव देसाई ,प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समितीचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. पी. पाटील उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी पाटील, उपप्राचार्य एम.डी. खंटागळे, पर्यवेक्षक एस.डी.साठे, तंत्र विभाग प्रमुख पी.बी. लोकरे यांचे प्रोत्साहन तर विजय पाटील, व्ही  एस सूर्यवंशी पाटील, जी .व्ही. पाटील, ए .एन. गोरुले, एम. बी टिपुगडे, ए .एम .कोळी, ए .एच भोई के .एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments