Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

श्री भवानी माता विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

 श्री भवानी माता विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.    अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- गुरुर्ब्रह्मागुरुर्विष्णुःगुरुर्देवोम...

 श्री भवानी माता विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.



   अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- गुरुर्ब्रह्मागुरुर्विष्णुःगुरुर्देवोमहेश्वरः।गुरुःसाक्षात्परंब्रह्म तस्मै श्रीगुरवेनमः॥

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री.भवानी माता विद्यालयात श्री दत्त महाराजांच्या आरतीने व सरस्वतीच्या पूजनाने गुरू पोर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.सोनटक्के सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक श्री.पातारे सर हे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री सोनटक्के सर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगताना आपले प्रथम गुरु आई वडील हेच असतात हे विद्यार्थ्यांना पटवून दिले प्राचार्य यांनी  शिक्षक हेही आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी रोज आपले आई-वडील यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनात यश  प्राप्त होते. हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.गुरुचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले आई वडील व शिक्षक हेच तुमचे गुरु आहेत. हे विद्यार्थ्यांना मनोगतामध्ये सांगितले. गुरु पौर्णिमेचे गीत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केले, त्यानंतर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक पातारे  सर यांनी गुरु स्तोत्र समजुन सांगत आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी गुरू कशी मदत करतात या बद्दल आपले विचार व्यक्त केले व विद्यार्थ्यांना गुरुचे महत्व आयुष्यामध्ये कशाप्रकारे असते ते सांगितले , त्याचप्रमाणे विद्यालयातील आव्हाड सर यांनी नाथ परंपरेमधील गुरुचे महत्व तसेच नाथ संप्रदायामधील मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांची कथा  गुरुनिष्ठा कशाप्रकारे असते हे स्पष्ट करताना सांगितले , तसेच शिक्षक मनोगतामध्ये श्री. नरसाळे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना  संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधील स्पष्टीकरण देऊन गुरुचे  महत्व सांगितले त्याचप्रमाणे  माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी त्यांचा  मनोगतातून  गुरु पौर्णिमेचे महत्त्व व्यक्त केले. श्री.गावडे सर व श्री.बहिर सर यांनी सर्व कार्यक्रमाचे क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गुंजकर सर यांनी केले. उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापक श्री.अमोल ताठे सर यांनी आभार प्रदर्शन केले याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्ष waक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

No comments