Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

मेन राजाराम मध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी ...

  मेन राजाराम मध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी ... सद्य परिस्थितीत मोबाईल हा आपला गुरु असून त्याचा योग्य कामासाठी वापर करावा... सुवर्णा साव...

 मेन राजाराम मध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी ...



सद्य परिस्थितीत मोबाईल हा आपला गुरु असून त्याचा योग्य कामासाठी वापर करावा... सुवर्णा सावंत माध्यमिक शिक्षणाधिकारी



कोल्हापूर:: येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित, मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ,कोल्हापूर या प्रशालेत आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली .या कार्यक्रम प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.याप्रसंगी त्या म्हणाल्या,आई आपला पहिला गुरु असून सद्यपरिस्थितीत मोबाईल हा आपला गुरु आहे.कारण त्याद्वारे आपणास नवनवीन उपयुक्त माहिती मिळते, फक्त याचा वापर योग्य कामासाठी करावा.आयुष्यात यशाचा मार्ग दाखवणारे आपले आई, वडील, शिक्षक, मित्र परिवार, समाजातील घटक या गुरूंचा आपण आदर करून तरूणाईने व्यसनाधिनतेपासून दूर रहावे ..



   रामकृष्ण परमहंस या गुरूंच्या सान्निध्यात नरेंद्रचे स्वामी विवेकानंद घडले, अगदी याचप्रमाणे आपण कुणाच्या संगतीत, सान्निध्यात वावरतो, यावरून आपल्या जीवनाचा यशापयशाचा मार्ग मिळतो,दिसतो असे मत कार्यक्रमांचे प्रमुख वक्ते सचिन पेडणेकर यांनी व्यक्त केले.

   भूतकाळाचा दुवा व भविष्यकाळाचा दिवा म्हणजे गुरू असून जो लघुला सुद्धा गुरू करतो तो खरा गुरू असून त्याप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा आहे असे मत कार्यक्रमांचे अध्यक्ष व प्रशालेचे प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी मांडले.

     सोनाली तावडे,संचिता सोडगे,सदाफ सय्यद,आदिती पाटील,तारा इलिगर,जुबेरिया बागवान,हर्षदा,जयश्री माने,सेजल मोरे या विद्यार्थिनींनी गुरू प्रती कृतज्ञतेचा भाव म्हणून मनोगते व्यक्त केली.तसेच मेन राजाराम कॉलेज चा माजी विद्यार्थी व प्रशालेच्या माजी प्राचार्या ,नुतन शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांचा मुलगा गणेश पाटील याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बी टी यादव, पाहुण्यांची ओळख व स्वागत प्रा बाबासो माळवे, सूत्रसंचालन प्रा सुषमा पाटील,प्रतिक्षा बोगरनाळ, तृप्ती पाटील व आभार प्रा राहूल देशमुख यांनी मानले.या कार्यक्रमांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

No comments