Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

आरटीओ कोल्हापुरात डास व दुर्गंधीची तक्रार घेतली गंभीरतेने; स्वच्छतेसाठी तत्काळ कारवाई!

 आरटीओ कोल्हापुरात डास व दुर्गंधीची तक्रार घेतली गंभीरतेने; स्वच्छतेसाठी तत्काळ कारवाई! कोल्हापूर | आरटीओ कोल्हापूर कार्यालयात गेल्या काही द...

 आरटीओ कोल्हापुरात डास व दुर्गंधीची तक्रार घेतली गंभीरतेने; स्वच्छतेसाठी तत्काळ कारवाई!




कोल्हापूर |

आरटीओ कोल्हापूर कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव व दुर्गंधीमुळे कर्मचारी व नागरिक त्रस्त झाले होते. यासंदर्भात योगदान न्यूज क्रिएटर अभिजीत पाटील यांनी यावर आवाज उठवत योग्य त्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.


तक्रार प्राप्त होताच मा. आरटीओ सातारे साहेब आणि कोळी मॅडम यांनी तत्काळ याची गंभीर दखल घेतली. त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या संबंधित स्वच्छता विभागाशी संपर्क साधून लगेचच कार्यालय परिसराची सफाई व डास निर्मूलनाची मोहीम राबवली.


महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करत परिसरातील घाणीचे निर्गमन, कीटकनाशक फवारणी व एकंदर परिसर स्वच्छ केला. यामुळे कर्मचारी वर्ग व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


आरटीओ कार्यालयाच्या या जलद प्रतिसादाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

अशा प्रकारे नागरिकांच्या समस्यांना तात्काळ प्रतिसाद मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन यावेळी अनेकांनी केले.



---


🖊️ वार्ताहर: अभिजीत पाटील

📍 योगदान न्यूज, कोल्हापूर

No comments