Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

कु. निर्जला पाटील हिचा सत्कार करताना सुपरवायझर एस.एल. पुजारी व शिक्षक वृंद

 कु. निर्जला पाटील हिचा सत्कार करताना सुपरवायझर एस.एल. पुजारी व शिक्षक वृंद    उषाराजे हायस्कूल, कोल्हापूरच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...

 कु. निर्जला पाटील हिचा सत्कार करताना सुपरवायझर एस.एल. पुजारी व शिक्षक वृंद 

 


उषाराजे हायस्कूल, कोल्हापूरच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न 

कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार 


कोल्हापूर-शनिवार दिनांक 28-06-2025 रोजी ताराराणी विद्यापीठाचे उषा राजे हायस्कूल कोल्हापूर या विद्यालयात इयत्ता दहावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उषा राजे हायस्कूलचे शिक्षक विनायक पाटील यांनी प्रास्ताविक केले. नंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. एस.डी. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की गुणवंत विद्यार्थिनींच्या यशात पालकांचाही फार मोठा वाटा आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिल्याने चांगले गुण मिळाले आहेत. शिक्षक, पालक व विद्यार्थिनी यांचा योग्य समन्वय असल्याने पाल्याने चांगले यश संपादन केले आहे. उपस्थित पालकांचे मुख्याध्यापिका चौधरी मॅडम यांनी स्वागत केले. तसेच गुणवंत विद्यार्थिनींना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील 10 गुणवंत विद्यार्थिनींचा मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, उप मुख्याध्यापिका व्ही.डी. जेमिनीस, एस.एल. पुजारी, पोवार मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कु. निर्जला विलास पाटील हिचा सत्कार विद्यालयाचे पर्यवेक्षक एस एल पुजारी सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निर्जला पाटील हीची आई सुप्रिया पाटील व वडील विलास पाटील हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमास उषा राजे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस.डी चौधरी मॅडम, उपमुख्याध्यापिका व्ही. डी . जेमिनीस तसेच पोवार मॅडम, पर्यवेक्षक एस.एल. पुजारी सर, इतर शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थिनींचे पालक, शाळेतील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी विद्यालयाचे शिक्षक विनायक पाटील सर यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments