Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

डॉ.सुधाकरराव चव्हाण : सर्वसामान्य युवकांचे प्रेरणा स्त्रोत

 डॉ.सुधाकरराव चव्हाण : सर्वसामान्य युवकांचे प्रेरणा स्त्रोत! अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- 'सेवा' शिक्षणाचा आत्मा आहे. शिक्...

 डॉ.सुधाकरराव चव्हाण : सर्वसामान्य युवकांचे प्रेरणा स्त्रोत!



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-

'सेवा' शिक्षणाचा आत्मा आहे. शिक्षणाची परिणती सेवाभावी माणूस निर्माण करण्यात आहे. या विचाराने कर्मवीर भाऊराव पाटील प्रेरित झाले होते, त्याची जाणीव आपल्याला आहे. आणि म्हणून शिक्षणातून स्वार्थी माणसे निर्माण झाली तर ती देशाला विघातक ठरतील. माणसांनी स्वतःसाठी जगावे हा स्वार्थी विचार होईल इतरांसाठी जगण्यात मोठा आनंद असतो हा पाठ भाऊरावांना शिक्षणातून द्यावयाचा होता.. म्हणून त्यांनी शिक्षणातून क्रांती केली. हीच प्रेरणा काही अंशी स्वतःमध्ये अवलंब करत त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करणारे काहीजण असतात. यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेले आणि हजारो युवकांचे प्रेरणास्त्रोत बनलेले डॉ. सुधाकरराव चव्हाण यांचा उल्लेख करता येईल.


वाड्या, तांड्या, वस्तीवरून आपल्या जीवनाची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरुवात करताना आणि जिल्हा परिषद शाळेतून पुढे येताना त्यांनी अत्यंत सक्षमपणे आत्मविश्वास जिद्द चिकाटी या मूल्यांवर त्यांनी स्वतःला झोकून देत थेट डॉक्टरेट आणि शिक्षण क्षेत्राचे केंद्रस्थान समजल्या जाणाऱ्या विद्यापीठांमध्ये कर्तव्य बजावत आपला सेवा धर्म कायम ठेवला.


आपण ज्या समाजातून आलो त्या बंजारा समाज बांधवांच्या साठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत त्यांना शैक्षणिक आधार आणि योग्य दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.


गोरगरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा आग्रह करून योग्य दिशा देण्याचे काम डॉ. सुधाकरराव चव्हाण यांनी केले आहे. सेवा हाच शिक्षणाचा पाया आहे. याची जाणीव त्यांना सतत होते. हा निखळ विचार त्यांना शिक्षणातून सेवाभावी पिढी निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरतो आहे .

नुकताच त्यांच्या या अध्यात्मिक शैक्षणिक सेवा कार्याला दोन दशक पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा विशेष कौतुक सोहळा झाला, अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सद्यस्थितीतील विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी सबंध महाराष्ट्रातून वारकरी पंढरीच्या वारीत विठ्ठलाच्या भेटीसाठी तल्लीन झाले आहेत. अशा पवित्र प्रसंगी दिंडीमधील वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि समाज धुरीन डॉ. सुधाकरराव चव्हाण यांनी आशीर्वाद घेतले.

No comments