सौ . सविता पाटील कुमार विद्या मंदिर, इंगळी येथे अभ्यासिकेला सुरुवात इंगळी, ता. हातकणंगले – दि. 19/06/2025 कुमार विद्या मंदिर, इंगळी (ता. ह...
सौ . सविता पाटील
कुमार विद्या मंदिर, इंगळी येथे अभ्यासिकेला सुरुवात
इंगळी, ता. हातकणंगले – दि. 19/06/2025
कुमार विद्या मंदिर, इंगळी (ता. हातकणंगले) येथील मुख्याध्यापक यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली दि. 19 जून 2025 पासून शाळेमध्ये नियमित अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
ही अभ्यासिका दररोज सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत भरवली जात असून, शाळेतील प्रत्येक शिक्षक यामध्ये आलटून पालटून सहभाग घेत आहेत. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागावी, त्यांचे शैक्षणिक मार्गदर्शन व्हावे आणि गुणवत्ता वाढीस हातभार लागावा, या उद्देशाने अभ्यासिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी गावातील वपालकांनी याची विशेष नोंद घेऊन विद्यार्थी या अभ्यासिकेला कसे हजर राहतील याची खबरदारी घ्यावी
कुमार विद्या मंदिर, इंगळी हे शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिपथावर वाटचाल करत असून, अशा उपक्रमांमधून शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक बळकट होईल, असा विश्वास मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी व्यक्त केला आहे.
No comments