पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिक्षक रवींद्र पाटील सर , उपस्थित मान्यवर व पालक विद्या मंदिर नेर्ले शाळेत पालक मेळावा व योगा दिन उत्साह...
पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिक्षक रवींद्र पाटील सर , उपस्थित मान्यवर व पालक
विद्या मंदिर नेर्ले शाळेत पालक मेळावा व योगा दिन उत्साहात संपन्न
कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार
नेर्ले-शनिवार दिनांक 21-06-2025 रोजी जागतिक योगा दिन व पालक मेळावा विद्यामंदिर नेर्ले तालुका शाहुवाडी जि. कोल्हापूर या विद्यालयात उत्साहात पार पडला. सदर मेळाव्यात शाळेचा विद्यार्थी पट वाढवणे विविध उपक्रम स्पर्धा परीक्षा सांस्कृतिक कार्यक्रम वाचन चळवळ राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सुरुवातीला शाळेतील शिक्षक रवींद्र पाटील यांनी उपस्थितांचे शब्दसुमनाने स्वागत केले. तसेच विद्यार्थी पटसंख्या व भौतिक सुविधा यासंबंधी समस्या मांडल्या. शाळेतील काही विद्यार्थी इतर शाळेत प्रविष्ट झाले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले. पालकांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निरसन करण्यात आले. पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग टिकले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
शाळेतील विविध उपक्रमासंबंधी नेर्ले गावातील शिक्षक नारायण लोहार व गणेश चोरगे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील विविध उपक्रमास आमचेही सहकार्य राहील असे अभिवचन दिले. नेर्ले गावची मराठी शाळा व इतर खाजगी अनुदानित शाळा यातील फरक काय आहे हे सेवानिवृत्त शिक्षक नारायण लोहार सर यांनी योग्य पद्धतीने सांगितले. गणेश चोरगे सर यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व काय असते ते विशद केले. पालक वर्गातर्फे युवराज पाटील, बाळासाहेब पाटील, योगेश पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच शाळेला सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
योगेश पाटील यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जी काही मदत लागेल ते करण्याचे आश्वासन दिले. सदर पालक मेळावा नेर्ले गावच्या सरपंच सौ. अस्मिता दिंडे व दिलीप दिंडे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला या पालक मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा पवार सरपंच सौ. अस्मिता दिंडे, सौ. पूजा पाटील ग्रामपंचायत सदस्य सौ. कोमल पाटील, सौ. वर्षा पाटील, शिक्षणप्रेमी गणेश चोरगे सर व नारायण लोहार सर, माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, पालक युवराज पाटील, योगेश पाटील तसेच इतर पालक वर्ग उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संजीवनी कांबळे शिक्षक रवींद्र पाटील विठ्ठल गव्हाळे प्रमोद शेळके यांनी विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा प्रभावीपणे राबवून शाळेचा गुणवत्ता स्तर वाढवण्याचे आश्वासन दिले. शेवटी शिक्षक विठ्ठल गव्हाळे यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थित पालकांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments