पंचलक्ष्मी इंग्लिश मिडीयम स्कूल सिध्दनेर्ली येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा कौलव/ संदीप कलिकते २१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिन...
पंचलक्ष्मी इंग्लिश मिडीयम स्कूल सिध्दनेर्ली येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
कौलव/ संदीप कलिकते
२१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने आज पंचलक्ष्मी इंग्लिश मिडीयम स्कूल सिध्दनेर्ली येथे योग दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्याद्री गोरडे आणि प्रास्ताविक मधुरिमा माने यांनी केले संस्थेचे संस्थापक तानाजी पोवार सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर एस मेथे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योगांची आवश्यकता आहे त्यासाठी सर्वांनी आजपासून दररोज सकाळी योगासने करण्याचे आवाहन केले.त्यानंतर योग शिक्षीका.एस पी मगदुम यांनी ओमकार, प्रार्थना,खांद्याची हालचाल, कमरेच्या हालचाली,ताडासन,वृक्षासन,चक्रासन, पद्मासन,अशा अनेक प्रकारच्या योगासनांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांच्या कडून करून घेतली.यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर एस मेथे,योग शिक्षीका एस पी मगदुम, सांस्कृतिक विभाग प्रमुख जे एस माने , पाटील मॕडम,ऐ ऐ जाधव,के एस शिंदे,एम बी कुंभार,एस एस कांबळे, ,यांच्यासह शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी आभार.वेदीका घराळ यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने केली
No comments