Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

महात्मा जोतिराव फुले हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज, बेलवळे बुद्रुक येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

  महात्मा जोतिराव फुले हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज, बेलवळे बुद्रुक येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा वार्ताहर: संतोष पाटील, बेलवळे बुद्रुक श्र...

 महात्मा जोतिराव फुले हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज, बेलवळे बुद्रुक येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा



वार्ताहर: संतोष पाटील, बेलवळे बुद्रुक




श्री. दत्त एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा जोतिराव फुले हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज, बेलवळे बुद्रुक येथे जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य ए. एम. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून केली. त्यांनी योगाचा मानवजीवनातील महत्त्व पटवून दिले. यानंतर टी. आर. मोरे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले.

योगदिनानिमित्त विविध योगासने व प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. हे प्रात्यक्षिके श्री. टी. आर. मोरे, श्री. बी. ए. पाटील, आणि अश्विनी भांदीगरे यांनी सादर केली. यावेळी जेष्ठ शिक्षक श्री. बी. व्ही. पाटील, अशोक कांबळे, ए. के. शिंदे, आणि श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थित सर्वांना जागतिक योगदिना निमित्त शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी शाळा समन्वयक श्री. रवी पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबतची जाणीव व त्याचा आरोग्यासाठी होणारा लाभ याबद्दल महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवला.


No comments