Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर डिंगोरे जुन्नर येथे संपन्न

  समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर डिंगोरे जुन्नर येथे संपन्न  अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अं...

 समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर डिंगोरे जुन्नर येथे संपन्न 



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-


भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत जुन्नर तालुका संरक्षण विभाग यांचे वतीने व बौध्द विकास तरूण मंडळ डिंगोरे यांच्या नियोजनातुन रविवार दि.15/ 06/2025 रोजी सकाळी 10.00 ते सांय 5.00 वाजेपर्यंत एक दिवशीय समता सैनिक शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले.

मेजर ॲड.अनिल कांबळे केंद्रिय शिक्षक, समता सैनिक दल/बी.एस.आय.पुणे डिव्हिजन पुणे,मेजर सुभाष कांबळे केंद्रीय शिक्षक,समता सैनिक दल पुणे बटालियन यांनी शिबिरार्थींना ग्राउंड व लेखी स्वरूपात उत्तम प्रशिक्षण दिले.

शिबिर कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम संस्कार उपाधयक्ष केंद्रीय शिक्षक आयु.रविंद्र अभंग, जुन्नर तालुका अध्यक्ष आयु.नितीन साळवे, सरचिटणीस आयु.यशवंत गायकवाड,कोषाध्यक्ष आयु विजय वाघमारे, हिशेब तपासनीस आयु खंडू माळवे .संस्कार उपाधयक्ष केंद्रिय शिक्षक आयु.अतिश उघडे, संरक्षण उपाध्यक्ष,समता फोर्स डिव्हिजन ऑफिसर पुणे आयु.दिपक खरात,संस्कार सचिव आयु.संजय धोत्रे समता सैनिक व प्रचार पर्यटन सचिव आयु.प्रभाकर धोत्रे,आयु.राहुल धोत्रे,आयु.बाळासाहेब खरात(शाखा पनवेल).आयु.सुनिल शिंदे,आयु.चेतन साळवे (माजी श्रामणेर)बौध्दाचार्य आयु.बी.बी.खरात,आयु.मिलिंद खरात, भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी महासभा पदाधिकारी राष्ट्रपती पुरस्कार साहित्यिक डॉ खं र माळवे,आयु.गौरव कदम,आयु.रविंद्र धोत्रे,आयु.कैलास साळवे,आयु.विजय हिंगे,यांनी शिबिरात भाग घेतला.

समता सैनिक प्रशिक्षण शिबिरात तालुक्यातील १० महिला व १५ पुरूष एकूण २५ शिबिरार्थिनी सहभाग घेतला.

    बौध्द विकास तरूण मंडळ डिंगोरे पदाधिकारी,उपासक,उपासिका,उपस्थित होते.

आयु.दिपक भगवान खरात समता फोर्स सैनिक डिव्हिजन ऑफिसर,पुणे संरक्षण उपाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा जुन्नर तालुक्याच्या वतीने सर्वांचे आभार मानले .

No comments