पी एम श्री. मनपा महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी, कोल्हापूर या विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न कोल्हापूर प्रतिनिधी-ना...
पी एम श्री. मनपा महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी, कोल्हापूर या विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न
कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार
फुलेवाडी-सोमवार दिनांक 16-06-2025 रोजी पीएम श्री. मनपा महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी, कोल्हापूर या विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम दिमाखात पार पडला. मा.ना. प्रकाश आबिटकर पालकमंत्री , सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत विद्यार्थी संस्कार शिबिर संपन्न झाले. एक पेड माॅ के नाम या उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
100 दिवस कृती आराखडा संस्कार शिबिर अंतर्गत जीवनमूल्य वर आधारित प्रा. राजेंद्र पाटील यांचे व्याख्यान झाले. शालेय परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर यांनी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
विद्यालयातील इयत्ता पहिली मध्ये नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प व पेढे देऊन स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण व गणवेश वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या पहिलीच्या विद्यार्थ्यांना लंडन बस मधून फुलेवाडी भागातून आनंददायी फेरफटका मारण्यात आला. यावेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. इयत्ता पहिली चे 100 विद्यार्थी उपस्थित होते.
या शानदार कार्यक्रमास कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मा. श्री. कपिल पाटील, नगरसेवक व उद्योजक मा. श्री. राहुल माने, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूरचे प्रा. राजेंद्र पाटील, सौ. सुप्रिया खाडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सर्व सदस्य तसेच पीएम श्री मनपा महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा रमेश शिंत्रे व सर्व शिक्षक शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments