महात्मा जोतिराव फुले हायस्कुल मध्ये केले नवागत *विद्यार्थ्यांचे स्वागत.* बेलवळे बुद्रुक ( संतोष पाटील) आजपासून राज्यातील प्राथमिक शाळांच...
महात्मा जोतिराव फुले हायस्कुल मध्ये केले नवागत *विद्यार्थ्यांचे स्वागत.*
बेलवळे बुद्रुक ( संतोष पाटील)
आजपासून राज्यातील प्राथमिक शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'शाळा प्रवेशोत्सव २०२५' कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील, कागल तालुक्यातील बेलवळे बु.या गावातील महात्मा जोतिराव फुले हायस्कुल व ज्यु. कॉलेज या शाळेतील नवागत विद्यार्थ्यांचे वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत करणेत आले.
यावेळी श्री. दत्त एज्यूकेशन चे कार्याध्यक्ष वसंतराव पाटील खजानीस एस एम पाटील सर, प्राचार्य ए. एम पाटील सर, सेक्रेटरी हेमंत पाटील,संचालक आर. एच पाटील यांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यांना पुस्तके व शालोपयोगी साहित्यांचे वाटप केले.
त्याचप्रमाणे शाळेच्या भौतिक सुविधांच्या उपलब्धतेसाठी निधीमिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन केले .
यावेळी माजी मुख्याध्यापक बी. व्ही. पाटील, बी. ए. पाटील, टी. आर. मोरे, अशोक कांबळे, एस के. पाटील, ए.के. शिंदे, माजी सेक्रेटरी जी. ए. पाटील श्रीकांत पाटील असे जेष्ठ शिक्षक, यांच्यासह शिक्षक वर्ग,विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments