Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

प्रवीण लता बाबुराव नलावडे यांना पुणे महानगरपालिकेचा सन्मान

 प्रवीण लता बाबुराव नलावडे यांना पुणे महानगरपालिकेचा सन्मान पुणे: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते...

 प्रवीण लता बाबुराव नलावडे यांना पुणे महानगरपालिकेचा सन्मान




पुणे: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते श्री प्रवीण लता बाबुराव नलावडे यांना "श्री प्रवीण लता बाबुराव नलावडे पुरस्कार" देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान सामाजिक विभागाचे उपयुक्त नितीन उदास व समाज कल्याण अधिकारी रामदास चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले व दिव्यांग कल्याण आयुक्त राजेश पुरी देखील उपस्थित होते.

सामाजिक कार्याचा प्रवास:



प्रवीण नलावडे यांनी महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्याला सुरुवात केली. २००३ साली त्यांनी "संजीवनी अपंग विकास संस्था, पुणे" स्थापन केली. या संस्थेद्वारे दिव्यांग व सामान्य लोकांसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत.

महत्वाची कामगिरी:

कोरोना काळात धान्य किट्स, हॉस्पिटल मदत, ब्लड इंजेक्शन, बेड्स, आणि ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिले.

दिव्यांग व्यक्तींना सरकारी योजना व कृत्रिम अवयव मिळवण्यासाठी सतत प्रयत्न केले.

तरुण पिढीच्या नोकरीच्या समस्या सोडवल्या.

मुलांची शालेय फी भरली आणि वयोवृद्ध व्यक्तींच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

मतदान जनजागृतीत योगदान:

प्रवीण नलावडे यांनी दिव्यांग व सामान्य नागरिकांना भेटून मतदान जनजागृती केली आहे.

पुरस्कार आणि गौरव:

महानगरपालिकेने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ प्रदान करून सन्मानित केले.

आपल्या कार्याचे संकल्प:

श्री प्रवीण नलावडे यांनी यावेळी आपल्या पुढील सामाजिक कार्याची बांधिलकी व्यक्त करत दिव्यांग व सामान्य लोकांसाठी अधिकाधिक उपक्रम राबवण्याचा निर्धार केला.

- आपल्या नम्र, प्रवीण लता बाबुराव नलावडे

अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, पुणे शहर दिव्यांग विभाग


No comments