Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

संभाजी पाटील रोटरी क्लब हातकणंगले सचिव पदी निवड – प्रेरणादायी यशाची कहाणी

  संभाजी पाटील रोटरी क्लब हातकणंगले सचिव पदी निवड – प्रेरणादायी यशाची कहाणी राधानगरी तालुक्यातील तळसंबळे गावातील छोटेसे गावातून प्रवास सुरू...

 संभाजी पाटील रोटरी क्लब हातकणंगले सचिव पदी निवड – प्रेरणादायी यशाची कहाणी



राधानगरी तालुक्यातील तळसंबळे गावातील छोटेसे गावातून प्रवास सुरू करून, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे संभाजी पाटील यांची रोटरी क्लब हातकणंगले सचिवपदी निवड झाली आहे.

संभाजी पाटील हे इंडियन पोलीस मित्र कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष असून, त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाने त्यांनी समाजात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. आज ते इचलकरंजी येथे स्थायिक असून, एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर काम करत आहेत.

संभाजी पाटील यांचा जीवनप्रवास संघर्षपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून वाटचाल करत, त्यांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची आवड आणि लोकसेवेसाठी असलेला वसा हा कायमस्वरूपी प्रेरणादायी ठरला आहे.

"आमचे मित्र म्हणून अभिमान"

संभाजी पाटील हे आमचे जिवलग मित्र असून, त्यांच्या यशाने आम्हाला खूप अभिमान वाटतो. त्यांनी सामाजिक कार्यात मोठी योगदान दिली असून, राधानगरी तालुक्यातील असल्यामुळे त्यांचा अधिक अभिमान वाटतो.

संभाजी पाटील यांच्या पुढील वाटचालीस “योगदान पोर्टल न्यूज” आणि “द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा” कडून हार्दिक शुभेच्छा!

– सागर ल. शेळके

मुख्य संपादक, योगदान पोर्टल न्यूज /जिल्हाध्यक्ष, द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर

No comments