** गोष्ट छोटीच पण डोंगराएवढी** 🙏🏻 न्यू इंग्लिश स्कूल जरगनगर 🙏🏻 काल माझ्या काॅलेजच्या गॅदरिंग समारंभाच्या सूत्रसंचालन करून न्यू इ...
**गोष्ट छोटीच पण डोंगराएवढी**
🙏🏻 न्यू इंग्लिश स्कूल जरगनगर 🙏🏻
काल माझ्या काॅलेजच्या गॅदरिंग समारंभाच्या सूत्रसंचालन करून न्यू इंग्लिश स्कूल जरगनगर या माध्यमिक शाळेत व्याख्यानासाठी गेले असता शाळेचे मुख्याध्यापक,को जि म चे सक्रीय सदस्य मा.जी .जी.चव्हाण सर यांचे सर्वोत्कृष्ट प्रशासन,अध्यापनातील अनुभव,सहका_याशी ,पालक, विद्यार्थी व संस्थेशी असणारे सलोख्याचे संबंध जाणवले.त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवाळीत मी १०हजाराची पुस्तके घेतली ही पोस्ट आमचे मार्गदर्शक माजी मुख्याध्यापक मा.बी.एस.कांबळे सर यांनी शेअर केली आणि हे वाचून त्याच दिवशी आदरणीय चव्हाण सर स्वतः च्या खिशातील २५००रक्कम खर्च करून विद्यार्थी व स्वतः साठी पुस्तके घेतली.बरं ही गोष्ट त्यांनी सांगितली असती तर आत्मप्रौढी मिरवल्यासारखे वाटले असते.पण त्यांचा स्टाफ सांगत होता.स्वत:ची पाठ स्वतः थोपटता येत नाही त्यासाठी सात्विक विचाराने भारलेल्या माणसांनी कौतुक करावे लागते.मुख्याध्यापकाचे कौतुक करणारा स्टाफ मला जवळून पाहता आला.आज मकर संक्रांत..आज तिळगुळ वाटा नाही तर हत्तीवरून साखर वाटा, माणूस गोड तेव्हाच बोलणार आहे जेव्हा तो गरजेचा असतो.मग अशावेळी आपल्या सोबत ही पुस्तके, विचारांचा खजाना असतो.वाचनामुळे माणूस एकाकी कधी असू शकत नाही आणि त्याची प्रगती कोणी रोखू शकत नाही.👍🏻
आमचे कवी सुरेश भट म्हणतात की,**ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही.मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते**
मला एवढंच समजले बोलून, ऐकून, वाचून जग सुधारेल की माहित नाही पण मी स्वतः बदलले तरी पुष्कळ आहे.
माणूस हा अनुकरणप्रिय प्राणी आहे.त्यामुळे त्यांच्यासमोर सदैव आदर्शवत असणा-या गोष्टी असाव्यात..
चव्हाण सरांच्या शाळेच्या सर्व पालकांच्या प्रतिक्रिया ही खुप छान, सकारात्मक ऐकून मन भारावून गेले.शहरात शाळा असूनही कमालीचा आज्ञाधारकपणा , अभ्यासू वृत्ती मुलांच्यात जाणवली.खर तर मुख्याध्यापक हा घराच्या पत्र्याच्या शेडाप्रमाणेच असतो.ऊन ,वारा, पाऊस त्याला सहन करावा लागतो.सर्वाची मने सांभाळावी लागतात.पण ज्यांच्याकडे कुशलता, निर्णयक्षमता, समयसूचकता हजरजबाबीपणा, सहकार्य वृत्ती असते तो छान शाळा चालवू शकतो.. कालच्या भोगी सणानिमित्त माझ्या ही ओंजळीत या शाळेने वेगवेगळे सात्विक गुण,बघण्याची सकारात्मक वृत्ती ,नम्रता विनयशीलता या गुणांचे दान दिले.याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल जरगनगर या शाळेचे संस्थापक कार्याध्यक्ष माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकसाहेब, मुख्याध्यापक चव्हाण सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांची मी मनापासून आभारी आहे.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🏻
No comments