भिवंडी शहरात मकरसंक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला भिवंडी शहरात मकरसंक्रांतीच्या पवित्र सणानिमित्ताने एकत्रित येत आन...
भिवंडी शहरात मकरसंक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला
भिवंडी शहरात मकरसंक्रांतीच्या पवित्र सणानिमित्ताने एकत्रित येत आनंद आणि सलोख्याचे प्रतीक म्हणून तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मनसे उपतालुका अध्यक्ष श्री. हनुमान वारगडे साहेब, प्रदिप बोडके साहेब, तसेच विशाल बारनीस (जिल्हा सचिव, मुरबाड विधानसभा) यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. अजय भानुशाली यांनी केले होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून एकोप्याचा संदेश देत सामाजिक बांधिलकीचे महत्व अधोरेखित केले.
"सण हे केवळ आनंद साजरा करण्यासाठी नसतात, तर ते माणसाला माणसाशी जोडण्याचे माध्यम असतात," असे विचार प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमामध्ये स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. "तिळगुळ घ्या, गोड गोड बोला" या वाक्याने प्रत्येकाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे भिवंडी शहरात सामाजिक एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अजय भानुशाली आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करण्यात आले.
No comments