Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

श्री शाहू हायस्कूल, ज्यूनि कॉलेज मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

  श्री शाहू हायस्कूल, ज्यूनि कॉलेज मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न पत्रकार- सुभाष भोसले शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हा...

 श्री शाहू हायस्कूल, ज्यूनि कॉलेज मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न



पत्रकार- सुभाष भोसले

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कुल, ज्यूनि कॉलेज मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला .



या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय रेळेकर मा प्रेसिडेंट रोटरी क्लब, प्रमुख पाहुणे नागेश खैरमोडे पोलिस निरीक्षक, कागल पोलिस स्टेशन , संजय चितारी  राष्ट्रवादी कागल तालुका शहर अध्यक्ष उपस्थित होते प्रमुख पाहुण्याचां परिचय पी बी माणगावे यांनी केला .स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य टी ए पोवार यांनी केले त्यांनी श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज मधील सर्व उपक्रमाचां आढावा घेतला ते म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने कै . प्रा एम आर देसाई, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली या वेळी  प्रमुख मान्यवरांचा  सत्कार करणेत आला . प्रमुख पाहुणे नागेश खैरमोडे मनोगतात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईल,व्यसनापासून अलिप्त राहावे वाहतूकीच्या नियमाचे पालन करावे विद्यार्थ्यांनीं करीयर कडे लक्ष द्यावे . कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय रेळेकर म्हणाले की, रोटरी क्लबचे 117 देशात काम चालू असून शाहू हायस्कूल चा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे .विद्यार्थ्यांनीं नेहमी प्रयत्नशील असावे, कष्टाला पर्याय नाही  यावेळी सर्व माध्यमिक व ज्यूनिअर कॉलेज मधील शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थीनीचा सत्कार करणेत आला . माध्यमिक विभाग बक्षिस वितरण सूत्रसंचालन एम बी शेडबाळे, उच्च माध्यमिकचे पी बी देसाई, एम बी पाटील तर किमान कौशल्य विभागाचे डी एम आवले यांनी केले . या समारंभालाशिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलतराव देसाई, चेअरमन डॉ सौ .मंजिरी मोरे-देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, वरिष्ठ लिपिक के बी वाघमोडे यांचे प्रोत्साहन लाभले 





 या वितरण समारंभाला प्राचार्य टी. ए. पोवार , उपप्राचार्या एस. व्ही. कुडतरकर, उपमुख्याध्यापिका सौ .एस एस पाटील, पर्यवेक्षक एम व्ही बारवडे, तंत्र विभाग प्रमुख एस यु देशमुख, अनिल गायकवाड, एम .डी निंबाळकर, आर आर कुलकर्णी, काका भोकरे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सौ टी ए पाटील, सौ व्ही व्ही कुंभार तर आभार आर एस पाटने  यांनी मानले .

No comments