शासकीय नवोपक्रम स्पर्धेत शिक्षक कपिल पाटील, रोहिदास विद्या मंदिर, कागल येथील नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड पत्रकार- सुभाष भोसले...
शासकीय नवोपक्रम स्पर्धेत शिक्षक कपिल पाटील, रोहिदास विद्या मंदिर, कागल येथील नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
पत्रकार- सुभाष भोसले
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे,महाराष्ट्र यांचेमार्फत घेण्यात आलेल्या 'शासकीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये कागल नगरपरिषद शिक्षण विभागाच्या संत रोहिदास विद्या मंदिर कागल शाळेने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाचवा क्रमांक पटकावला.
शाळेतील उपक्रमशील शिक्षक कपिल पाटील यांनी राबविलेल्या 'उन्नतीचा करू निर्धार, आपली शाळा आपला आधार-पेरणी आनंददायी शैक्षणिक वातावरणाची' या नवोपक्रमाचा जिल्हास्तरावर पाचवा क्रमांक आला असून सदर नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शाळेतील आनंददायी शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांना सहभागी करून घेण्याच्या कृतींमधून शाळेला एक ऊर्जाकेंद्र बनविणे हा या नवोपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
अध्ययन ही मुळात एक आनंददायी प्रक्रिया आहे. पण या प्रक्रियेतील आनंद हरवला तर मात्र मुलांना शाळेकडे यावेसे वाटत नाही. मुलांना अभ्यासाचा कंटाळा वाटतो. शाळा चुकविण्याचे प्रमाण वाढत जाते. पालकांना मुलांमधील या अनास्थेचे कारण समजून येत नाही. ही समस्या समोर धरून हा नवोपक्रम घेण्यात आला आहे. यामध्ये विविध छोट्या छोट्या आनंददायी उपक्रमांची योजना करण्यात आली आहे. विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांना एकत्रितपणे शाळेशी जोडून ठेवण्याचे काम या नवोपक्रमातून होत राहते. शाळेतील उपक्रम आणि कार्यक्रमात योग्य त्या ठिकाणी पालक, माजी विद्यार्थी आणि शाळा परिसरातील कलाकारांचा सहभाग घेतला जातो. विविध क्षेत्रभेटी, पाचशे देईन पण पाच रुपये घेईन,मी आणि आई, माझा वाढदिवस माझा संकल्प,प्रेरणादायी स्टिकर्स, शिक्षक बालक पालक वर्ष अशा उपक्रमांनी या नवोपक्रमामध्ये रंजकता आणली.
सदर उपक्रमासाठी कोल्हापूर डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, अधिव्याख्यात्या सरिता कुदळे, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, विभागप्रमुख पॉल सोनूले,केंद्रप्रमुख शफीक इनामदार, मुख्याध्यापक शहाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन आणि सर्व शिक्षक स्टाफ व पालक संघांचे सहकार्य लाभल्याचे शिक्षक कपिल पाटील यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री
नामदार हसनसो मुश्रीफ, . प्रकाशराव गाडेकर आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी शाळेसाठी भरीव निधी व भौतिक सोयी सुविधा मिळवून दिल्या. यामुळे नवोपक्रमासाठी पोषक वातावरण तयार झाले व आनंददायी शैक्षणिक वातावरणाची पेरणी करणे सुलभ झाले.
No comments