Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

एकताच्या वतीने दिवाळी पहाट काव्य संमेलनाचे आयोजन

  एकताच्या वतीने दिवाळी पहाट काव्य संमेलनाचे आयोजन  अहमदनगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-: वेदनेला फुंकर माणुसकीची हे ब्रीदवाक्य घेऊन चौफेर का...

 एकताच्या वतीने दिवाळी पहाट काव्य संमेलनाचे आयोजन 




अहमदनगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-: वेदनेला फुंकर माणुसकीची हे ब्रीदवाक्य घेऊन चौफेर कार्य करणाऱ्या एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि.2 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा पहाट या राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एकताचे प्रवक्ते मल्हारी खेडकर आणि आहिल्यानगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

         बारामती जि.पुणे येथील प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखालील या काव्य संमेलनाचे उद्घाटन गुहागर जि.रत्नागिरी येथील कवी बाळासाहेब लबडे हे करणार असल्याचे फाउंडेशन चे सचिव पत्रकार गोकुळ पवार व कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर यांनी सांगितले. कवयित्री मेनका धुमाळे (लातूर), फौजी अमोल देसाई (पनवेल), पाथर्डी जि.आहिल्यानगर येथील शेतीनिष्ठ कवी रामकिसन शिरसाट, कवयित्री सिमा लिंबगावकर (माजलगाव), केज जि.बीड चे कवी हनुमंत घाडगे, जगन्नाथ कांबळे (बीड), अंबड जि.जालना येथील युवाकवी पवन शेळके हे निमंत्रित मान्यवर या राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलनात सहभाग नोंदवणार असून या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवयित्री डाॅ.रेखा ढेरे-घोलप (बीड) या करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष नितीन कैतके व प्रदेश युवक सरचिटणीस बलराम मनिठे यांनी दिली.

         एकता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, विभागीय संघटक संपादक राजा पुजारी, परभणी जिल्हाध्यक्ष पु.ना.बारडकर, उपाध्यक्ष मेघा नांदखेडकर, महानगरीय अध्यक्षा प्रा.शोभाताई घुंगरे आणि एकता कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन संपन्न होणार असून प्रस्तावना अशोक आवंतकर (कोषाध्यक्ष, एकता फाउंडेशन बीड) व आभार प्रदर्शन संतोष दौंडे (प्रतिनिधी, एकता फाउंडेशन शेवगाव) हे करणार आहेत असे एकताचे आहिल्यानगर जिल्हा निमंत्रक पत्रकार प्रशांत बाफना व उपाध्यक्षा मिरा दगडखैर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

         या काव्य संमेलनामध्ये रसिक श्रोत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन एकताचे सहसचिव लखुळ मुळे, सल्लागार ॲड.ढाकणे, महिला आघाडी प्रमुख रंजना फुंदे, केंद्रीय कार्यकारिणीतील डाॅ.सचिन सानप, माही शेख, कैलास तुपे, राजेश बीडकर, दिपक महाले, डाॅ.शोभा सानप, रंजना डोळे, लता बडे, शोभा राजळे, हरिप्रसाद गाडेकर, पो.काॅ.ज्ञानेश्वर पोकळे, महादेव राऊत, फौजी कैलास खेडकर, प्रा.महेश नागरे, प्रदेश लेखक आघाडी प्रमुख दिनकर जोशी, प्रदेश युवक निमंत्रक इम्रान शेख, मराठवाडा विभागीय सचिव प्रो.अंबादास केदार, विभागीय महिला आघाडी प्रमुख प्रा.डाॅ.संगीता घुगे, विभागीय युवक संघटक सुनिल महाराज केकाण, सातारा जिल्हाध्यक्ष रंजना सानप, हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुरलीधर पंढरकर, नांदेड जिल्हाध्यक्ष ॲड.सुचिता गिते, बीड जिल्हाध्यक्ष विजयकुमार मिसाळ, संभाजीनगर युवक जिल्हाध्यक्ष पत्रकार के.बी.शेख, बुलढाणा युवक जिल्हाध्यक्ष पत्रकार सज्जन शेळके, परभणी युवक जिल्हाध्यक्ष गजानन बेळे, बीड युवक जिल्हाध्यक्ष अमोल राठोड, गुहागर तालुकाध्यक्ष संजय मालप, पैठण तालुकाध्यक्ष शहादेव सुरासे, पाथर्डी तालुकाध्यक्ष राजेंद्र उदारे, शेवगाव तालुकाध्यक्ष प्रशांत ढाकणे, शिरूर कासार तालुका युवक आघाडी प्रमुख अनिकेत ढाकणे, विद्यार्थी आघाडी प्रमुख कार्तिक कांबळे यांनी केले आहे. 

No comments