एकताच्या शाखेचे आज पाथर्डीत उद्घाटन कवितेच्या फराळाने रसिकांची दिवाळी --------------------- अहमदनगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-एकता फाउंडे...
एकताच्या शाखेचे आज पाथर्डीत उद्घाटन
कवितेच्या फराळाने रसिकांची दिवाळी
---------------------
अहमदनगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या शाखेचा शुभारंभ 3० ऑक्टोबर रोजी पाथर्डी शहरात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व शंकर महाराज मठाचे मताधिपती परमपूज्य माधव बाबा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सपना काटे या होत्या तर प्रमुख मान्यवर म्हणून संजय मेहकर होते हे होते यावेळी जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री संदीप काटे एकताचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष कवी राजेंद्र उदारे यांच्यासह एकताची सचिव गोकुळ पवार कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर एकताचे प्रवक्ते मल्हारी खेडकर प्रदेश संघटक देविदास शिंदे अहिल्यानगरचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब कोठुळे शब्दगंधाचे डॉक्टर अनिल पानखडे आजिनाथ डोमकावळे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते
वेदनेला फुंकर माणुसकीची ही ब्रीदवाक्य घेऊन एकता महाराष्ट्र मध्ये कार्य करत आहेत सामाजिक शैक्षणिक व साहित्य क्षेत्राबरोबरच वैयक्तिक सुखदुःखाचे कार्य सुद्धा एकता करत आहे वंचितांना मदतीचा हात देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जाते समाज हिताचा दुर्दम्य आशावाद डोळ्यासमोर ठेवून अखंडपणे चालणारी ही मानव सेवा संस्थेच्या माध्यमातून आपण करत असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष अनंत कराड यांनी आपल्या मनोगतात सांगितले यावेळी जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री संजय मेहकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सपना काटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले एकता फाउंडेशनचा निस्वार्थी भाव आणि समाजाप्रती असलेली दातृत्वाची भावना यामुळे निश्चितच या संस्थेचा अल्पावधीतच वटवृक्ष होईल व पाथर्डी करिता ही निश्चितच पर्वणी ठरणार असे ठाम मत अविनाश मंत्री यांनी मांडले त्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून सहमती दर्शवली तसेच स्वास्तिक वाचनालयाच्या संचालिका व या कार्यक्रमाचे अध्यक्ष सपना काटे यांनी एकदा फाउंडेशनच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या सामाजिक कार्यकर्ते संजय मेहकर यांच्या शास्त्रीय संगीतातील सुरेल बासरी वादनाने उपस्थित प्रेक्षक रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकली व कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले व यावेळी पाथर्डी शाखेचे उद्घाटन झाले असे अध्यक्ष यांनी घोषित केले यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
कार्यक्रमाचे द्वितीय सत्र मध्ये काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प निवृत्ती महाराज कानवडे (संगमनेर) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी गोरख पवार (नेवासा) हे उपस्थित होते या काव्य संमेलनाची बहारदार सूत्रसंचालन कविवर्य बाळासाहेब कोठुळे यांनी केले या काव्य संमेलनासाठी बाळासाहेब मनतोडे (राहुरी) आत्माराम शेवाळे (वाघोली) शशिकांत गायकवाड (पाथर्डी) महेश लाडणे (अमरापूर) देविदास शिंदे (बालमटाकळी) चंद्रकांत उदागे (पाथर्डी) निवृत्ती महाराज कानवडे (संगमनेर) सुरेश वैरागर (सोनई) राजेंद्र उदारे(पाथर्डी) बाळासाहेब कोठुळे (चितळी) हे सर्व कवी सहभागी झाले होते वेगवेगळ्या विषयावरील कवितेने काव्यरसिकांना दिलखुलास हसवले व विचार करायला लावणाऱ्या काही रचनाही या कार्यक्रमांमध्ये सादर झाल्या तर काही भावनेचा वेध घेणाऱ्या कविता सादर झाल्या उपस्थित आमच्या डोळ्यांच्या कडा सुद्धा ओल्या झाल्या राजकीय कवितांनी धुमाकूळ करत रसिक प्रेक्षकांची दिवाळी उत्साहात साजरी झाली
या कार्यक्रमास रागिनी उदा रे हुमायून आतार ह भ प अमोल सोळसे संदीप काटे कृष्णा रेपाळ सुभाष भागवत योगेश इ धा टे सचिन लगड नवनाथ तरटे मेजर आनंद पंडागळे म्हातारदेव ढाळे आत्माराम शास्त्री बिडवे नंदकिशोर औटी पत्रकार अनिल खाटेर रामभाऊ घोडके रामनाथ बंग दादाभाऊ ढमाळ अरुण ताठे कारभारी शिंदे गणेश वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
No comments