खोजेवाडी येथे भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा अहमदनगर प्रतिनिधी (बाळासाहेब कोठुळे)-पाथर्डी तालुक्यातील खोजेवाडी येथे 2 नोव्हेंबर पासून दिनांक ९...
खोजेवाडी येथे भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा
अहमदनगर प्रतिनिधी (बाळासाहेब कोठुळे)-पाथर्डी तालुक्यातील खोजेवाडी येथे 2 नोव्हेंबर पासून दिनांक ९ नोव्हेंबर पर्यंत श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा समाधी मंदिर खोजेवाडी या ठिकाणी ह भ प उद्धव महाराज धमाल (चितळी) ह भ प कृष्णा महाराज ताठे (चितळी) ह भ प उद्धव महाराज जाधव (चितळी) ह भ प काकडे गुरुजी (धामणगाव देवीचे) ह भ प लक्ष्मण महाराज शेजुळ (चितळी) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणार असून भागवताचार्य श्रीकृष्ण कृपांकित डॉक्टर विकास नंदजी मिसाळ या कार्यक्रमाचे मुख्य कथा प्रवक्ते आहेत या कथेच्या कार्यक्रमाची वेळ सायंकाळी 9 ते रात्री 10 अशी असून काकडा भजन नामपुष्पांजली हरिपाठ गाथा पारायण व अन्नदान या कार्यक्रमाबरोबरच वैकुंठवासी गुंतवणे महाराज पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ह भ प उद्धव महाराज ढमाळ यांचे हरिकीर्तन होणार आहे दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते 11 या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यावेळी चंद्रभान गोंदवणे सर यांची महाप्रसादाची पंगत होईल या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक भाविकांचे अन्नदान होणार असून राजकीय अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती या कार्यक्रमास सदिच्छा भेट देणार आहेत तेव्हा परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान संयोजन समितीने केले आहे
No comments