जनसेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या; सामाजिक कार्याला मिळणार नवी दिशा संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पिंटूदादा गोरे...
जनसेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या; सामाजिक कार्याला मिळणार नवी दिशा
संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पिंटूदादा गोरे यांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्ताराला वेग
कोल्हापूर / प्रतिनिधी :
जनसेवक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या विस्तारासाठी संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पिंटूदादा गोरे यांनी राज्यभर संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
यामध्ये श्री. अशोक बाळू भंडारी यांची ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून तर श्री. प्रदीप सुभाष जाधव यांची कोल्हापूर शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्त्या संघटनेच्या सामाजिक कार्याला अधिक गती देणाऱ्या ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जनसेवक प्रतिष्ठान ही संस्था वंचित, उपेक्षित आणि गरजू घटकांच्या न्यायासाठी कार्यरत असून सामाजिक बांधिलकी जपत राज्यभर जनसेवेचे विविध उपक्रम राबवत आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कार्य करावे, अशी अपेक्षा संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पिंटूदादा गोरे यांनी व्यक्त केली.
या नियुक्त्यांबद्दल सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
✍️ संपादकीय – पत्रकार सागर शेळके
"पद हे प्रतिष्ठेचे नसून जबाबदारीचे असते."
समाजकारणात एखाद्या व्यक्तीला पद मिळणे ही केवळ नियुक्ती नसते, तर समाजाच्या अपेक्षा आणि विश्वासाची पावती असते. जनसेवक प्रतिष्ठानने राज्यभर संघटन विस्तारासाठी केलेल्या या नियुक्त्या समाजहिताच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहेत.
संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पिंटूदादा गोरे यांनी सक्षम व कार्यक्षम नेतृत्व घडविण्याचा घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, कोणत्याही पदाधिकाऱ्याची खरी ओळख नियुक्तीपत्रात नसते; ती त्यांच्या प्रत्यक्ष जनसेवा, प्रामाणिक कार्य, पारदर्शकता आणि लोकांच्या विश्वासातून निर्माण होत असते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय, मदत आणि विकासाची भावना पोहोचवली, तर ही नियुक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल. समाजाला केवळ पदाधिकारी नव्हे, तर कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारे नेतृत्व आवश्यक आहे.
— पत्रकार सागर शेळके
संपादक


No comments