*कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आता माजलगांव पोलीस ठाण्याचे नवे ठाणेदार; कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथमता प्राधान्य देणार ! (बीड जिल्ह...
*कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आता माजलगांव पोलीस ठाण्याचे नवे ठाणेदार; कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथमता प्राधान्य देणार !
(बीड जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी. बीड जिल्हा पोलीस दलात जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशावरून सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये संभाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांची माजलगाव पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. त्यांनी तेथील पदभार परळी शहरांचे रघुनाथ नाचन यांच्याकडे सुपूर्द केला असून. पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात सलग दोन वर्षाचा कालावधी मिळाला. त्यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक गुन्हे उघडकीस आणून, जनतेशी वेळोवेळी सुसंवाद ठेवून, सण,उत्सव काळात ही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील होते. पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांची संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरांत आपल्या उत्कृंष्ट सेवेमुळे सर्वसामान्यांच्या मनात एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली होती. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांच्या बदलीमुळे परिसरांतील सर्वसामान्य जनता ही भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पण तेथील त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांची नियमित बदली आल्याचे वृत्त समोर आहे. आता त्यांच्याकडे माजलगाव पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या एन्ट्रीमुळे माजलगाव पोलीस ठाण्याला एक कर्तव्यदक्ष, आणि खमक्या अधिकारी मिळाल्याचे परिसरांतून बोलले जात आहे. पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्यासह जिल्ह्यात सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.*

No comments