प्रवास मराठी भाषेचा डॉ.वनिता अरुण मोरे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कोल्हापूर भ्रमणध्वनी: ९८५०४१९२१० २७ फेब्रुवारी, कवी कुसुम...
प्रवास मराठी भाषेचा
डॉ.वनिता अरुण मोरे
महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कोल्हापूर
भ्रमणध्वनी: ९८५०४१९२१०
२७ फेब्रुवारी, कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करतो. मातृभाषेचा गौरव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात हा मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला जातो. मातृभाषा मराठी या मायबोली विषयीची कृतज्ञतेची भावना आपल्या मनात कायम असते म्हणूनच मराठी भाषेबद्दलची कृतज्ञता या दिवशी आपण उत्सव रूपाने साजरा करतो.
मराठी भाषेला प्राचीन आणि समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्यामुळेच आज मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृतीला खूप महत्त्व आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला जागतिक नावलौकिक प्राप्त झालेले आहे त्यामुळेच आपल्या मराठी भाषेला महाराष्ट्राची ओळख व संस्कृतीचा वारसा मिळालेला दिसून येतो. महाराष्ट्राची संस्कृती, विचार ,मूल्य, संस्कार या सर्व गोष्टीमुळे व्यक्तीच्या जीवनाला आदर्श जीवन जगण्याची आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आणि बळ देण्याचे हे एक साधन आहे. संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. अभंग,ओवी, भजन ,भारुड ,कीर्तन,गाथा इ. माध्यमातून सामाजिक परंपरा, मूल्य, संस्कार आणि सामाजिक एकता टिकवून ठेवण्याची कार्य मराठी भाषाने केलेलं आहे. संत तुकाराम ,एकनाथ, जनाई ,मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांनी महाराष्ट्र ची संस्कृती जपून ठेवून तिचा वारसा.... चालवण्याचा मोठा प्रयत्न केलेला दिसून येतो.यामध्ये मराठी भाषेचा वाटा हा मोलाचा आहे.आपल्या लेखनातून ज्ञानेश्वरांनी संस्कृत मधील 'गीता' मराठी भाषेत आणली ज्ञानेश्वरांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते .त्यांच्या लेखनातून मराठी भाषेचा गोडवा दिसून येतो.मराठी भाषेचे सामर्थ्य हे त्यांच्या लेखन कार्यातून आपल्याला दिसून येते.
महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातील संताने फक्त लेखन कार्य केलेले नाही तर मराठी भाषा टिकून ठेवण्याचे मोलाचे आणि जबाबदारीचे कार्य त्यांनी आपल्या लेखनातून केलेले पहावयास मिळते त्यांच्या लेखनामधून सर्वांना प्रबोधन करण्या सोबतच मराठी भाषा टिकून ठेवण्याचे आणि संवर्धन करण्याचे कार्य त्यांनी केले. वारकरी पंथातील संत तुकाराम महाराजांनी फार मोठी कामगिरी केली आहे. समाजातील अंधश्रद्धा, विषमता आणि भोंदूगिरी यांच्या विरोधात खडे बोल सुनावले संत तुकाराम महाराजांनी सुमारे पाच हजार पेक्षा जास्त अभंगांचे मराठी भाषेतून लेखन करून समाजाला घडविण्याचा आणि भाषा संवर्धन करण्याचा त्यांचा मोलाचा वाटा दिसून येतो.
महाराष्ट्रामध्ये दर बारा कोसावर भाषा बदलते उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र ,विदर्भ ,मराठवाडा आणि कोकण अशा विविध भागातील लोकांच्या मध्ये मराठी भाषा बोलण्यात विविधता आढळून येते. महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि भाषिक विविधता जतन करण्यामध्ये लोककला तसेच आदिवासी आणि ग्रामीण समुदाय यांच्या दैनंदिन जीवनातून साकारले जाणारी कला ही लोकांच्या सांस्कृतिक परस्परांशी जोडलेली दिसून येते. लावणी, पोवाडा, तमाशा, गोंधळ, ढोल, लेझीम, भारुड इत्यादींच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये सांस्कृतिक परंपरा जोपासलेली दिसून येते आणि त्यांचे लोकजीवन समजून घेता येते.
स्थानिक स्तरावरील व विशिष्ट जात व धंद्यानुसार वापरात येणाऱ्या भाषेच्या रूपात बोली असे म्हणतात ग्रीयेर्सन या मराठी भाषेच्या अभ्यासाने १९०५ मध्ये मराठी भाषेची पाहणी केली त्यानुसार मराठीच्या प्रांतिक बोलींची वर्गवारी केली त्यामध्ये *दक्षिण गट -पुणे, बुलढाणा ,विजापूर, धारवाड *कोकण -ठाणे ,मुंबई, कुलाबा, जंजिरा ,मदनगर, नागपूर_ वराड, अकोला चांदा बालाघाट बस्तर रायपूर ,भंडारा ,चिंदवाडा यांचा समावेश होतो.
मराठी भाषेचे कालिक भेट काही अशा प्रकारे झालेले दिसून येतात.*यादवकालीन मराठी-लीळाचरित्र ,विवेक सिंधू ,रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरी ,इ. हा काळ मराठीचा रसाळपणा, श्रेष्ठता, अर्थगांभीर्य आणि विचारांची उंची इ. गुणांचे दर्शन देणारा होता.*बहाम निकालीन मराठी -या काळात संत एकनाथ, कान्होपात्र ,दामाजीपंत , नृसिंह सरस्वती,दासोपंत इ. संतांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.*शिवकालीन मराठी-संत तुकाराम ,संत रामदास ,तुकोबा याच काळात पंडिती काव्याचा विकास झालेला दिसून येतो.*पेशवेकालीन मराठी-बखर ,पोवाडा, लावणी, चित्रकाव्य, शृंगार यांची रचना झालेली दिसून येते.*ब्रिटिश कालीन मराठी-वृत्तपत्रे ,साप्ताहिके, निबंध, नाटक ,पुस्तके, तसेच मराठीत ज्ञानात्मक भौतिक माहितीबद्दलच्या लेखनास याच काळात प्रारंभ झालेला दिसून येतो.*स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी-अक्षर गणवृत्ते ,मात्रा वृत्तानतातील काव्याची जागा मुक्तचंदाने घेतली . याच काळात दलित साहित्याच्या लेखनाने मराठी भाषेला वेगळी समृद्ध समृद्धी मिळाली. अनेक स्त्री लेखिकांनी मराठीच्या बोलीचा विकास होऊन परी निश्चित मराठीत त्यांनी भर घातली याच काळात मराठी भाषा व साहित्य याला राजाश्रय मिळू लागला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अनेक वर्षापासून मराठी भाषकांची मागणी होती आणि शेवटी दि.०३/१०/२०२४ रोजी केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला दिसून येतो पण हे इतकं सोपं नव्हते त्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक होते जसे की १५०० ते २००० वर्षाचा भाषेचा इतिहास ,स्वतंत्र भाषा ,श्रेष्ठ व अभिजात साहित्याची निर्मिती. या सर्व बाबी पूर्ण करून एक आदर्श दर्जा प्राप्त झाला आणि त्यातून देशातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा मिळाली. तसेच मराठी भाषेच्या विकास केंद्रांसाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळाले .शाळा, शिक्षक ,विद्यार्थी, ग्रंथालय, आणि वाचन संस्कृती यांच्यामध्ये गुणात्मक वाढ होण्यासाठी मदत झाली.
***

No comments