Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

बाळकृष्ण पाटील सोनुर्लेकर यांचा 27 वा स्मृतिदिन सोनुर्ले येथे संपन्न

  बाळकृष्ण पाटील सोनुर्लेकर यांचा 27 वा स्मृतिदिन सोनुर्ले येथे संपन्न  कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार सोनुर्ले तालुका शाहूवाडी जिल्हा कोल...

 बाळकृष्ण पाटील सोनुर्लेकर यांचा 27 वा स्मृतिदिन सोनुर्ले येथे संपन्न 



कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार

सोनुर्ले तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथील बाळकृष्ण पाटील सोनुर्लेकर यांचा 27 वा स्मृतिदिन पार पडला . याप्रसंगी चंद्रकांत मुगडे यांनी बाळकृष्ण पाटील यांच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले की


यशस्वी होण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही  आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचन हळूहळू कमी होत चाललेले आहे याचा परिणाम त्याच्या भावी जीवनावर होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात यश प्राप्त होत नाही मोबाईल पेक्षा वाचन पुस्तकाचे अत्यंत महत्त्वाचे आहे ग्रामीण भागामध्ये यशस्वी होण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही विद्यार्थ्यांनी याची जाण ठेवून भावी वाटचाल करावी .स्मृतिदिन म्हणजे व्यक्तीने केलेल्या कार्याचे, आठवणीचे दिवस साजरा करणे. बाळकृष्ण पाटलांनी 1964 पासून ते 1999 पर्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक शैक्षणिक व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची दृष्टी लक्षात घेऊन काम केले त्यामुळेच त्यांचे नाव पंचक्रोशीत घेतली जाते. त्यांचे कार्य हीच त्यांची ओळख समजली जाते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील होते. करण सिंह गायकवाड माध्यमिक विद्यालय सोनुर्ले या विद्यालयाच्या  संस्थेचे उपाध्यक्ष अण्णा पाटील सर यांनी त्यांच्या कार्याचा प्रास्ताविकामध्ये आढावा घेतला. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, मराठी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी व परिसरातील सर्व संस्थेचे पदाधिकारी हजर होते. या कार्यक्रमाचे आभार मोहिते सर व स्वागत कांबळे सर यांनी केले

No comments