Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

शिवजयंतीचे औचित्य साधून*“शिवप्रेरणेचा जागर – विकासाचा नवा संकल्प”सुरु

  शिवजयंतीचे औचित्य साधून*“शिवप्रेरणेचा जागर – विकासाचा नवा संकल्प”सुरु कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार *विद्या मंदिर धोंडेवाडी तालुका शाहु...

 शिवजयंतीचे औचित्य साधून*“शिवप्रेरणेचा जागर – विकासाचा नवा संकल्प”सुरु



कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार

*विद्या मंदिर धोंडेवाडी तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि दिमाखदार वातावरणात साजरी करण्यात आली.* संपूर्ण परिसर शिवमय झाला होता आणि विद्यार्थ्यांपासून ग्रामस्थांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व अभिमान झळकत होता.

या कार्यक्रमासाठी *जिल्हाधिकारी कार्यालयातील कोल्हापूर येथे कार्यरत असणारे श्री. सुनील घाग साहेब प्रमुख पाहुणे* म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. *विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी व राष्ट्रनिर्माण कार्यावर प्रभावी आणि ओजस्वी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.*

*धोंडेवाडी शाळेच्या छत दुरुस्तीसाठी प्रमुख पाहुणे श्री. सुनिल घाग साहेब यांनी रु. ५०,०००/- इतकी भरीव आर्थिक मदत देत शाळेप्रती असलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.* त्यांच्या या उदार सहकार्याबद्दल ग्रामस्थ व शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या योगदानामुळे शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

याचप्रमाणे शाळेतील *माजी शिक्षकांनीही शाळेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत एकूण रु. ११,५०२/-* इतकी मदत प्रदान केली. त्यामध्ये –

*मधुकर देसाई सर – रु. ५००१/-*

*अशोक पाटील सर (वाघवे) – रु. २५००/-*

*सुरेश पाटील सर – रु. २०००/-*

*युवराज पाटील सर – रु. १००१/-*

*बाबासो कांबळे सर – रु. १०००/-*

ही सर्व रक्कम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने *प्रातिनिधिक स्वरूपात श्री. अशोक पाटील सर (वाघवे)* यांच्या मार्फत मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आली. माजी शिक्षकांचा हा सहभाग शाळेप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा अधोरेखित करणारा ठरला.

कार्यक्रमादरम्यान शाळेतील *माजी विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत “माजी विद्यार्थी संघ” स्थापन* करून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला. हा उपक्रम शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.

या प्रसंगी सोनुर्ले गावचे प्रथम नागरिक *सरपंच श्री. भागोजी कांबळे, उपसरपंच श्री.बळवंत मुगडे, श्री.आण्णा पाटील सर,डॉ. संजय मुगडे, श्री. संजय काटकर, श्री. संजय झिटे, श्री. प्रकाश नाईक, श्री. चंद्रकांत मुगडे सर, धोंडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन कुंभार सर,पालक, वाडीतील तरुण मंडळांचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

एकूणच हा शिवजयंती उत्सव केवळ एक औपचारिक कार्यक्रम न ठरता, शाळा–पालक -ग्रामस्थ–माजी विद्यार्थी–माजी शिक्षक यांच्यातील स्नेहबंध दृढ करणारा, प्रेरणा देणारा आणि शाळेच्या विकासासाठी नवे संकल्प घडवणारा ऐतिहासिक सोहळा ठरला. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक करून शाळेच्या उपक्रमशीलतेचे अभिनंदन केले.

No comments