इयत्ता पहिली प्रवेशोत्सव कार्यक्रम आलाबाद प्रतिनिधी साताप्पा कांबळे कापशी (से) ता.कागल . ...
इयत्ता पहिली प्रवेशोत्सव कार्यक्रम
आलाबाद प्रतिनिधी साताप्पा कांबळे
कापशी (से) ता.कागल
. श्री सेनापती विद्यामंदिर कापशी शाळेमध्ये सन 2025 26 सालातील शाळेतील इयत्ता पहिली प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत मुलांचे ट्रॅक्टर ट्रॉली सजवून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली मुलांनापुस्तक वाटप व पहिलीच्या मुलांना सॅक वाटप मोठ्या उत्साहात पार पडला त्याचबरोबर सन 2025 26 मध्ये इयत्ता पहिली सीबीएससी पॅटर्न अभ्यास नवीन आल्याने त्याला अनुसरण ग्रुप ग्रामपंचायत कापशीच्या वतीने पहिलीच्या वर्गासाठी इंट्रॅक्टीव्ह टीव्ही प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात बोलताना पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत दादा खोत म्हणाले की आधुनिक पद्धतीचं शिक्षण घेत असताना आधुनिक तंत्रज्ञाना चा वापर होणे गरजेचे आहे त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काही लागेल ते सहकार्य करण्याचं आव्हान दादांनी केलं त्याचबरोबर शाळेच्या खिडक्यांना स्लाइडिंग व जाळी व वॉटर फिल्टर देण्याचे कबूल केले शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकाने अतोनात प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आवाहन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही एस परीट यांनी शाळेविषयी माहिती व ग्राम पंचायतीने शाळेसाठी दिलेले योगदान व शाळा व्यवस्थापन समितीने दिलेले योगदान याविषयी माहिती दिली, व मुलाच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळा काय काय प्रयत्न करते. यांची गावकऱ्यांना माहिती दिली शाळा अनेक प्रकारचे अनेक उपक्रम राबवत असून मुलांचा शैक्षणिक दर्जा २०२४/२५ सालामध्ये जो ठेवला त्याच्यापेक्षा उंचावण्याचं आव्हान श्री परीट यांनी केले सदरच्या कार्यक्रमाला गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ उज्वला कांबळे मॅडम उपसरपंच रजनीकांत नाईक त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सागर दुधाळे व इसाक मकानदार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अजित नाईक उपाध्यक्ष व इतर सदस्य पोलीस दक्षता समिती सदस्य विद्या मोरे सुद्धा उपस्थित होत्या ,त्याच बरोबर इयत्ता पहिली हे दाखल करणारे बहुसंख्य माता पालक उपस्थित होते.
No comments