अवयवदानाचा आदर्श उपक्रम: सरपंच दीप्ती माने आणि विकासराव माने यांचे उल्लेखनीय योगदान अंबप गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. दीप्ती विकासराव मान...
अवयवदानाचा आदर्श उपक्रम: सरपंच दीप्ती माने आणि विकासराव माने यांचे उल्लेखनीय योगदान
अंबप गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. दीप्ती विकासराव माने यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. त्यांनी आणि विमानतळ प्राधिकरण सदस्य श्री. विकासराव माने यांनी आज, 15 जून 2025 रोजी अवयवदान नोंदणी करून समाजासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
या प्रसंगी पर्व शैक्षणिक संस्थेचे प्रवीण वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदानाचा हा उपक्रम राबवण्यात आला.
या वेळी सर्वांना अवयवदान नोंदणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
हा उपक्रम समाजासाठी एक प्रेरणा असून, या माध्यमातून भविष्यात अधिकाधिक लोकांनी अशा कार्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. समाजसेवेच्या या पवित्र कार्याबद्दल अंबप गावात सर्वत्र कौतुकाचे वातावरण आहे.
No comments