Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

जिल्हा कार्याध्यक्ष पदावर शिवाजी बापू गिरीगोसावी यांची नियुक्ती

  जिल्हा कार्याध्यक्ष पदावर शिवाजी बापू गिरीगोसावी यांची नियुक्ती कोल्हापूर: राष्ट्रीय अध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी मंडळ (ट्रस्ट) यांच्या वतीन...

 जिल्हा कार्याध्यक्ष पदावर शिवाजी बापू गिरीगोसावी यांची नियुक्ती



कोल्हापूर: राष्ट्रीय अध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी मंडळ (ट्रस्ट) यांच्या वतीने शिवाजी बापू गिरीगोसावी यांची जिल्हा कार्याध्यक्ष, कोल्हापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवाजी बापू गिरीगोसावी हे प्रामाणिक, निष्ठावान व कठोर परिश्रम करणारे व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या अनुभवामुळे संघटनेची प्रतिमा उंचावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर भ्रष्टाचार विरोधी मंडळाच्या विविध उपक्रमांना बळ मिळेल आणि कोल्हापूर जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी लढ्याला नवी दिशा मिळेल.



श्री. गिरीगोसावी यांना नेमणूक पत्र देताना राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी स्वतःचे लेटर हेड, स्टँप व बोर्ड तयार करून कार्याला सुरुवात करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला नवा वेग येईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

No comments