महादेवनगरीत कुत्र्यांच्या हल्ल्याचा बळी: आठ वर्षीय मुलगी जखमी कोल्हापूर, 28 मे – महादेवनगरी परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे भीतीचे वाताव...
महादेवनगरीत कुत्र्यांच्या हल्ल्याचा बळी: आठ वर्षीय मुलगी जखमी
कोल्हापूर, 28 मे – महादेवनगरी परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल दुपारी महादेवनगरी, फुलवाडी रिंग रोड येथे राहणारी आठ वर्षांची अस्मिता देवप्पा कस्तुरे या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केला. हल्ल्यामुळे अस्मिताच्या मांडीला गंभीर जखम झाली असून तिच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महादेवनगरी परिसरात वीस ते पंचवीस कुत्र्यांची टोळकी फिरत असून नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. स्थानिकांनी वारंवार या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.
संबंधित प्रशासनाने या गंभीर घटनेकडे लक्ष द्यावे आणि तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
No comments