Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

कांचनताईंचे कार्य महिलांच्यासाठी प्रेरणादायी

  *कांचनताईंचे कार्य* *महिलांच्यासाठी प्रेरणादायी* कौलव प्रतिनिधी /संदीप कलिकते  स्वयंसिद्धा संस्थेच्या संस्थापिका कांचनताई परूळेकर यांचे अल...

 *कांचनताईंचे कार्य* *महिलांच्यासाठी प्रेरणादायी*



कौलव प्रतिनिधी /संदीप कलिकते

 स्वयंसिद्धा संस्थेच्या संस्थापिका कांचनताई परूळेकर यांचे अल्पक्षा आजाराने नुकतेच निधन झाले त्यांना चैतन्य संस्था राजगुरुनगर प्रेरीत यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीरच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.

     शोकसभेत संघाच्या व्यवस्थापीका सुजाता कलिकते बोलताना म्हणाल्या स्वयंसिद्धा, डॉ व्ही टी पाटील व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कोल्हापूरच्या वतीने महिला उद्योगांचे जाळे तयार केले आहे, जिल्ह्यातील महिलांना घरबसल्या फावल्या वेळेत चविष्ट खाद्य पदार्थ,मातीची भांडी,कापडी वस्तू, लोणचे, मसाला तयार करणे अशा अनेक व्यवसायाचे मार्गदर्शन करून व्यासपीठ बनवुन दिले होते,हजारो महिलांच्या हाताला काम देऊन संसाराला हातभार लावण्याचे काम केले आहे.म्हणुन त्यांचे महिलांच्यासाठी काम प्रेरणादायी आहे.यावेळी संघाच्या कार्यकर्त्यां मनिषा शिंगाडे,शितल कुसाळे, वैशाली कांबळे यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या

No comments