Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्र शाळा कौलव येथे आरोग्य शिबीर संपन्न

  जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्र शाळा कौलव येथे आरोग्य शिबीर संपन्न  कौलव /संदीप कलिकते      जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून केंद्र शाळा...

 जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्र शाळा कौलव येथे आरोग्य शिबीर संपन्न 



कौलव /संदीप कलिकते


     जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून केंद्र शाळा कौलव येथे आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून लोकांनी या समाजसेवी उपक्रमांत स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असे प्रतिपादन अजित पाटील  यांनी केले. केंद्रशाळा कौलव येथील मोफत आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी आणि रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी शांताराम पाटील अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हे होते.


प्रारंभी प्रास्ताविक शाहू चौगले यांनी केले तर स्वागत आर जी पाटील यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष विक्रम वागरे, सरचिटणीस विकास पाटील , ग्रामपंचायत सदस्य रणजीत पाटील, विशाल कुंभार , बबन पाटील, पोलीस पाटील डी एस कांबळे यांचे सत्कार उपाध्यक्ष हिंमत कांबळे , दिलीप यादव, विजय पाटील, सागर पाटील , विशाल बनछोडे, संगिता पाटील, अमृता पाटील, अशोक पाटील सर , श्रीराम बडे यांच्या हस्ते करण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी  डॉ. शुभांगी पार्टे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व 233 मुलांचे रक्तगट तपासणी करून दिले.


जागतिक आरोग्य दिनानिमित्य रक्तदान शिबीरात  ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप मगदूम यांनी केले तर आभार मुख्याध्यापक पंडीतराव चव्हाण यांनी मानले. यावेळी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालक आणि सर्व शिक्षक वृंद यांनी योगदान दिले.


आज  रक्तदान केलेल्यांमध्ये पालकांसह शाहू चौगले, श्रीराम बडे  , संतोष कांबळे चेअरमन राधानगरी शिक्षक पतसंस्था , ओंकार जनार्दन  , समीर कुडाळकर , युवराज सुतार  , बाबुराव नाटेकर तसेच शांताराम पाटील सागर पाटील , तसेच अनेक महिलांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला.

No comments