Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

पानिपतकारविश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

  पानिपतकारविश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार बेळगाव...

 पानिपतकारविश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न



कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार

बेळगाव- मराठी साहित्याची उज्वल परंपरा आणि विचारशील वारसा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला, तो ६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने! दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी बेळगाव येते झालेल्या 6वे मराठी साहित्य  संमेलनाचे अध्यक्षस्थान ‘पानिपतकार’ म्हणून ओळखले जाणारे ख्यातनाम साहित्यिक विश्वास पाटील यांनी भूषवले.


संमेलनात मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रविंद्र पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. संजय कळमकर, डॉ. शरद गोरे, उद्घाटक आप्पासाहेब गुरव आणि स्वागताध्यक्ष डी. बी. पाटील उपस्थित होते.



संमेलनाचे आयोजन अत्यंत नेटके, सुयोग्य आणि प्रभावीरीत्या पार पडले. इतिहासाच्या गाभ्याला स्पर्श करत विश्वास पाटील यांनी आपल्या भाषणातून विचारांना चालना दिली. डॉ. कळमकर यांनी मराठी भाषेचा प्रभावी जागर घडवला, तर शेवटच्या सत्रात अभिजीत कालेकर यांच्या ‘लोकजागर संस्कृतीचा’ कार्यक्रमाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.


या संमेलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे गर्दीपेक्षा दर्दी, म्हणजेच खऱ्या अर्थाने साहित्यावर प्रेम करणारे रसिकच येथे उपस्थित होते. त्यामुळे संमेलनाचा प्रत्येक क्षण विचारमंथनाचा, संस्कृतीचा आणि शब्दप्रेमाचा अनुभव देणारा ठरला.

No comments