योगदान पोर्टल न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विशेष पुरस्कार सोहळा संपन्न – कोल्हापूर कोल्हापूर – योगदान पोर्टल न्यूजच्या प्रथम वर्धाप...
योगदान पोर्टल न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विशेष पुरस्कार सोहळा संपन्न – कोल्हापूर
कोल्हापूर – योगदान पोर्टल न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्नेहलोक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक विशेष पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या भव्य कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय ज्योतिष विशारद मा. साध्वी माताजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच योगदान पोर्टल न्यूजचे संपादक मा. सागर शेळके सर आणि इतर अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, सौ. सुषमा अमृत पाटील यांना महिला सक्षमीकरण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या समाजातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला. सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देणारा हा सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
—
No comments