Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

योगदान पोर्टल न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा संपन्न – कोल्हापूर

  योगदान पोर्टल न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा संपन्न – कोल्हापूर कोल्हापूर – योगदान पोर्टल न्यूजच्या प्रथम वर्धापन दिना...

 योगदान पोर्टल न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा संपन्न – कोल्हापूर



कोल्हापूर – योगदान पोर्टल न्यूजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्नेहलोक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात आले. या विशेष कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय जोतिष विशारद मा. साध्वी माताजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.


कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगदान पोर्टल न्यूजचे संपादक मा. सागर शेळके सर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.


या सोहळ्यात श्री. लखन बाबूराव तलवारे यांना "उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे पत्रकारितेतील योगदान, सामाजिक प्रश्नांवरील संवेदनशील मांडणी व निःपक्ष वृत्तांकन यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला.


या कार्यक्रमाने सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना नवा उत्साह व प्रेरणा दिली असून, "योगदान पोर्टल न्यूज"चे हे यश भविष्यातही असाच प्रभाव निर्माण करेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.


No comments