शाहुवाडी विकास सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय शिवाजी पाटील व इतर मान्यवर शाहुवाडी विकास सेवा प्रतिष्ठानचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न क...
शाहुवाडी विकास सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय शिवाजी पाटील व इतर मान्यवर
शाहुवाडी विकास सेवा प्रतिष्ठानचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार
कोल्हापूर-मुंबईमध्ये ऐरोली जानकीबाई मडवी हॉलमध्ये शाहूवाडी विकास सेवा प्रतिष्ठान चा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. शाहुवाडी तालुक्यातील मुंबईमध्ये राहणारे विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सुरुवातीला कार्यक्रमाचे सर्व अतिथी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम पथक असे कार्यक्रम घेण्यात आले. कुमारी श्रेया ज्ञानदेव पाटील या विद्यार्थिनीने प्रतिष्ठानने स्तुत्य कार्यक्रम घेतल्याने आपल्याला फार आनंद झाला असे नमूद केले त्याचबरोबर दिलीप पाटील मुंबई विद्यापीठ यांनी आपल्या मनोगतात मी शाहूवाडीकर व शाहवाडकर माझा या ब्रीदवाक्य बरोबर आपल्या शाहूवाडी तालुक्याचा विकास झाला पाहिजे हे आवर्जून सांगितले. माननीय सुरेश गायकवाड यांनी शाहूवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे हे विशद केले.
शाहुवाडी विकास सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात मुंबईतील शाहूवाडी तालुक्यातील लोक विस्कळीत झालेले होते ते एकत्रित कसे येतील यासाठी शाहूवाडी प्रतिष्ठानची स्थापना केली हे सांगितले. शेवाळी तालुक्यातील उद्योजक व्यावसायिक व इतर क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे सांगितले. महिला बचत गट, वधू वर सूचक संस्था, उद्योग व्यवसाय, शैक्षणिक व स्पोर्टस विभाग, माहिती, जनसंपर्क व सहकार्य विभाग या क्षेत्रात हे प्रतिष्ठान कार्यरत आहे. शाहूवाडी तालुक्यातील रहिवाशांना एकत्रित करून एकत्रित करून त्यांच्या परिवारासाठी भविष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे असे नमूद केले. आपल्या तालुक्यातील सर्व क्षेत्रातील तसेच विद्यार्थी गुणवंत व आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे पोहोचतील यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करेल असेनमूद केले.
यावेळी महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू व पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. शालेय मुलांना वस्तू वाटप करण्यात आले. शाहूवाडी विकास सेवा प्रतिष्ठानचे सभासद वाढवण्यासाठी सभासद नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
शाहुवाडी प्रतिष्ठान च्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेनेचे उपनेते विजयजी चौगुले, सुरेश गायकवाड वित्तीय सल्लागार महाराष्ट्र शासन, डॉक्टर दिलीप पाटील डायरेक्टर मुंबई विद्यापीठ, पी डी पाटील डायरेक्टर पोतदार स्कूल, विनायक जी कांबळे जीएसटी असिस्टंट कमिशनर, शंकर पाटील असिस्टंट रजिस्टर सिडको, आनंदराव माईंगडे संस्थापक दत्तसेवा माध्यमिक विद्यालय कोतोली, वाडी तालुक्यातील मुंबई मध्ये राहणारे विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शाहुवाडी विकास सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शिवाजी चंदू पाटील, उपाध्यक्ष कृष्णा पांडुरंग यादव, उपाध्यक्ष प्रकाश श्रीपती पाटील, सचिव प्रकाश आनंदा पाटील, सहसचिव मारुती कृष्णा पारले, सहसचिव रंगराव आप्पा पाटील, खजिनदार संतोष दगडू भिंगले, सहखजिनदार विकास गुंडा भोसले, हरी धोंडीबा लोहार, चंद्रकांत बाळू नाईक, तानाजी कृष्णा पाटील, दत्तात्रेय रामचंद्र चव्हाण, श्रीधर दामोदर शिंदे हे पदाधिकारी उपस्थित होते.
सेवा, सहकार्य, विकास
हाच एकमेव ध्यास
हे ब्रीदवाक्य घेऊन शाहूवाडी विकास सेवा प्रतिष्ठानची स्थापना 2015 रोजी नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आली. त्यापासून प्रत्येक वर्षी प्रतिष्ठान शाहूवाडी तालुक्यातील मुंबई मध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा स्नेह मेळावा आयोजित केला जातो असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय शिवाजी पाटील यांनी सांगितले. शेवटी सर्व मान्यवरांचे व इतर सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments